सर्वोच्च न्यायालयात नोकरी करण्याची इच्छा असणार्या सर्वांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. सर्वोच्च न्यायालयाने २१० कनिष्ठ न्यायालय सहाय्यक पदांच्या भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे.
पदासाठी भरती –
कनिष्ठ न्यायालय सहाय्यक
शैक्षणिक पात्रता –
उमेदवाराकडे शैक्षणिक पदवी असावी. त्याला इंग्लिश टायपिंगचे ज्ञान असावे. (३५ शब्द प्रति मिनिट) उमेदवाराला संगणकाची संपूर्ण माहिती असावी.
अंतिम तारीख –
अर्ज भरण्याची अंतिम तारीख – १०-०७-२०२२
वयोमर्यादा –
उमेदवाराचे कमाल वय ३० वर्षांच्या आत असावे. (अधिक माहिती तपासण्यासाठी प्रकाशित अधिसूचना पहावी)
अर्ज फी –
Gen/OBC/EWS: ५००/-
SC/ST/PWD: २५०/-
निवड प्रक्रिया –
सर्वात प्रथम उमेदवाराची ऑनलाइन चाचणी परीक्षा घेण्यात येईल. यामध्ये टायपिंग चाचणी पाहून निवड करण्यात येईल. (अधिक माहिती जाणून घेण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या अधिकृत वेबसाईटवर जावे)