पुणे : पुण्यातील वाघोली येथील जी एच रायसोनी इंजिनीअरिंग अँड मॅनेजमेंट महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय योगदिन उत्साहात साजरा करण्यात आला.
योगदिनाच्या औचित्याने विद्यार्थ्यांना योगासनाचे महत्त्व पटवून देण्यात आले. विद्यार्थी उत्साहाने योगासन करण्यात सहभागी झाले होते. सुमारे ३०० विद्यार्थ्यांनी या उपक्रमात आपला सहभाग नोंदवला.
यावेळी ओंकार, प्रार्थना, पूरक हालचाली, सूर्यनमस्कार, प्राणायाम, ध्यान आणि विविध योगासने करण्यात आली. योगासनाचे विविध प्रकार विद्यार्थ्यांनी यावेळेस केले. योगाअभ्यास महत्त्व लक्षात घेता स्वतंत्र विभाग देखील महाविद्यालयात स्थापन करण्यात आला आहे.
विद्यार्थ्यांबरोबर अनेक शिक्षकांनी देखील योग अभ्यासाला हजेरी लावली. कर्मचाऱ्यांनी उत्साहात योगासनांची प्रात्यक्षिके केली. प्राचार्य डॉ. आर.डी खराडकर, उपप्राचार्य डॉ. वैभव हेंद्रे, योग शिक्षक विभाग प्रमुख शरद देशपांडे, योग शिक्षक दिनेश बाजड यांनी या कार्यक्रमासाठी विशेष सहकार्य लाभले.