सध्या राज्यातील वातावरण खुप तापलेलं आहे. शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडामुळे महाविकास आघाडी सरकार संकटात सापडले आहे.
एकनाथ शिंदे आपल्या सहकारी आमदारांसह आसामला रवाना झाले आहेत. यातच संजय राऊत यांनी ट्विट करत महाविकास आघाडी सरकार बरखास्त होणार असल्याचे संकेत दिले आहेत.
यावर माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “मला राज्यसभेची उमेदवारी दिली असती तर शिवसेनेची अशी अवस्था झाली नसती. एवढं सगळं प्रकरण घडलं नसतं” असं म्हणत संभाजीराजेंनी शिवसेनेला टोला लगावलाय.
दरम्यान, आपल्या सोबत शिवसेनेचे ४० आमदार असल्याचा दावा एकनाथ शिंदेंनी केला आहे. तसेच पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी देखील आपल्या ट्विटरवरून मंत्रीपदाचा उल्लेख हटवला आहे. यामुळे येत्या काही तासांत राज्यात काय उलथापालथ होणार याकडे सर्वांचे लक्ष लागलंय.