राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या अभिनेत्री केतकी चितळेचा न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. ठाणे सत्र न्यायालयाने केतकी चितळेला जामीन दिला आहे. तिचा हा जामीन २० हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर मंजूर करण्यात आला आहे. यामुळे आता तिला कारागृहातून सुटका मिळेल अशी शक्यता वर्तविली जात आहे.
मध्यंतरी शरद पवार यांच्याविषयी वादग्रस्त फेसबुक पोस्ट केल्यामुळे केतकी चितळे अडचणीत सापडले होती. तिला अटक करण्याची मागणी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केली होती. केतकी चितळेवर अनेक गुन्हे देखील दाखल झाले होते. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी तिला ताब्यात घेतले होते.
परंतु आता बुधवारी केतकी चितळेचा ठाणे सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. यामुळे केतकीला चांगलाच दिलासा मिळाला आहे. आता केतकी लवकरच कारागृहातून देखील बाहेर येईल अशा चर्चा सध्या रंगल्या आहेत. दरम्यान आपल्या अटकेबाबत केतकी चितळेने उच्च न्यायालयात धाव घेतली होती.
यावेळी तिने आपल्याला करण्यात आलेली अटक बेकायदेशीर असल्याचे न्यायालयाने म्हटले होते. यानंतर आता केतकी चितळेचा जामीन मंजूर करण्यात आला आहे.