शारीरिक आरोग्यासाठी पपई खाणे अधिक फायदेशीर मानले जाते. पपई खाल्ल्यामुळे शरीरातील अनेक आजार दूर होतात. पपई चेहर्यासाठी तसेच सौंदर्य वाढवण्यासाठी खाणी खूप गरजेची असते. मुख्य म्हणजे, हे सोडून पपई खाण्याचे इतर ही अनेक फायदे आहेत.
१) पपई खाल्ल्यामुळे महिलांचा मासिक पाळीतील त्रास कमी होतो. पपई खाल्याने मासिक पाळीच्या त्रासात आराम मिळतो.
२) पपई खाल्ल्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते. तसेच शरीरातील विटामिन्स देखील वाढले जातात.
३) पपईचा रस चेहऱ्याला लावल्यानंतर चेहऱ्यावरील मुरूम दूर होतात. तसेच काळपटपणा देखील कमी होतो.
४) पपईचा रस खाल्ल्याने किंवा पपईचा ज्यूस पिल्यानंतर इन्सुलिनचे प्रमाण वाढते. तसेच शरीराला व्हिटॅमिन ए, सी, ई, बी आणि मॅग्नेशियम, पोटॅशियम कॅल्शियम मिळते.
५) पोटाचे आजार दूर करण्यासाठी पपई खाणे चांगले असते. कच्ची पपई खाल्ल्याने शरीराला भरपूर फायबर मिळते. त्याचबरोबर, बद्धकोष्ठतेची समस्या दूर होते.
६) पपई खाल्ल्यानंतर पचनक्रिया सुधारते. शरीरातील अन्नपचन प्रक्रिया सुरळीत चालण्यासाठी पपई मदत करते. अशा अनेक फायद्यांमुळे पपई खाणे गरजेची असते.