आपल्या मार्गात अडथळा आणणाऱ्या गोष्टींना फाट्यावर मारून स्वतःला सिद्ध करण्यासाठी धडपडणारी माणसं खूप मोठी होतात. गुजरातच्या सौराष्ट्र भागातील चोटीला येथील तुषार सुमेरा हे यातीलच एक ! दहावीच्या बोर्ड परीक्षेत इंग्रजीत 35 आणि गणितात 36 मार्क्स मिळालेला हा मुलगा जिद्द आणि चिकाटी च्या जोरावर चक्क IAS होतो. यातूनच ते गुणपत्रक आणि यश यांचा काडीचा संबंध नसतो हे आजच्या पिढीला दाखवून देतात.
कॉलेजचा फॉर्म भरताना केली होती ही चूक
तुषार सुमेरा हे सध्या गुजरातमधील भरूचचे जिल्हा दंडाधिकारी आहेत. त्यांचा जन्म एका मध्यमवर्गीय घरात झाला होता. दहावी व बारावी या दोन्ही वर्गात सुमेरा यांना चांगले मार्क न्हवते तेव्हा त्यांनी लोकांच्या सल्ल्यानुसार आर्टसला प्रवेश घेतला. त्यांना त्यांचं ग्रॅज्युएशन ( graduation ) इंग्लिशमध्ये पूर्ण करायचं होतं. मात्र, अॅडमिशन फॉर्ममध्ये नाव भरताना त्यांच्याकडून चूक झाली आणि पहिलं लेटर कॅपिटल लिहिण्याऐवजी त्यांनी स्मॉल लेटर्स वापरले आणि शेवटचे लेटर्स कॅपिटल लिहिले. त्यांच्या चुका झाल्या पण त्यांनी आशा सोडली नाही आणि त्यांनी अभ्यास सुरू ठेवला.
Newspaper Reading | वर्तमानपत्र वाचन ठरलं फायदेशीर
कॉलेजच्या दिवसात त्यांनी वर्तमानपत्र वाचण्यास सुरुवात केली. वर्तमानपत्रे वाचल्यामुळे त्यांना जागतिक अर्थव्यवस्था, परराष्ट्र धोरण, अर्थशास्त्र आणि सोशल ट्रेंड यासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींची माहिती मिळाली.
वर्तमानपत्रांमुळेचं त्यांच आर्टस् इंग्लिशचं पहिलं वर्ष पूर्ण झालं असं सुमेरा सांगतात. यानंतर तुषार सुमेरा यांनी मास्टर ऑफ आर्ट्स आणि बॅचलर ऑफ एज्युकेशन पूर्ण केलं. हे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांना प्रति महिना 2500 रुपये पगार असलेली शिक्षण सहाय्यकाची नोकरी लागली. पण काहीतरी वेगळं करायचं म्हणून त्यांनी IAS व्हायचं ठरवलं.
Family support | कुटुंबाची साथ महत्त्वाची
यासाठी शिक्षक सहाय्यकाची नोकरी सोडून त्यांनी अहमदाबादमधील सरदार पटेल इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक अॅडमिनिस्ट्रेशन (SPIPA) मध्ये प्रवेश घेतला. यावेळी घरच्यांनी फार पाठिंबा दिल्याने अभ्यास करता आला आणि यश मिळवता आले असे तुषार सुमेरा सांगतात. तुमचा आत्मविश्वास, कठोर परिश्रम आणि कौटुंबिक पाठबळ तुम्हाला यशाची लढाई जिंकण्यास मदत करते असे सुमेरा यांचे मत आहे.