एकनाथ शिंदेंनी केलेल्या बंडामुळे शिवसेनेला मोठं खिंडार पडलंय. यामुळे राज्यात कधीही सत्तापालट होई शकतो. एकनाथ शिंदे आपल्या गटासह भाजपसोबत सरकार स्थापन करणार आहे.
मात्र या धर्तीवर राज्याचे राज्यपाल भगत सिंग कोश्यारी सध्या रुग्णालयात आहेत. राज्यपालांना काल कोरोनाची लागण झाल्याचे वृत्त आले होते. मात्र आलेल्या माहितीनुसार राज्यपाल लवकरच राज्यभवनात परतणार आहेत.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे उद्या २४ तारखेला राजभवनात परतण्याची शक्यता आहे. यामुळे राज्यातील घडामोडींना वेग येण्याची शक्यता आहे.
दरम्यान, एकनाथ शिंदेंनी केलेल्या बंडामुळे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी वर्षा निवास्थानावरून आपला मुक्काम हलवला आहे. यावेळी हजारो शिवसैनिकांनी ठाकरेंचं स्वागत केलं. यामुळे येत्या काही तासांत राज्यात नेमकं काय होणार याकडे सर्वांचेच लक्ष लागलंय.