महाराष्ट्रातील पाच तरूण संशोधकांनी एक मोठी कामगिरी केली आहे. या पाच संशोधक तरुणांनी तामिळनाडूत एका नव्या विंचवाच्या प्रजातीचा शोध लावला आहे. या नव्या विंचवाच्या प्रजातीचे नाव ‘चिरोमॅचेट्स’ असे आहे. नवीन प्रजात ही ‘हॉरमुरीडी’ कुळातल्या ‘चिरोमॅचेट्स’ या जातीमधील एक आहे.
यापूर्वी या जातीतील फक्त पाच प्रजाती सर्वांना माहीत होत्या. मात्र या संशोधकांनी लावलेल्या शोधानंतर या प्रजातीत आणखीन ‘चिरोमॅचेट्स’ या प्रजातीचा समावेश झाला आहे. ‘हॉरमुरीडी’ कुळातल्या तीन प्रजाती महाराष्ट्र, केरळ आणि आंध्रप्रदेशात आढळून आल्या आहेत. तर आता नवीन प्रजात तामिळनाडूत आढळून आली आहे.
‘चिरोमॅचेट्स’ ही प्रजात तिरुनेवेली येथील अगस्त्यामलाई शिखराजवळ असणाऱ्या समुद्रसपाटीपासून ९०० ते ११५० मीटर उंचीवर एप्रिल २०२१ मध्ये आढळून आली होती. या प्रजाती वर्षभर संशोधन केल्यानंतर ही प्रजात नवीन असल्याचे संशोधकांच्या लक्षात आले. यानंतर त्यांनी या संदर्भात संशोधन प्रबंध सादर केला.
पुढे २२ जूनला हा प्रबंध अमेरिकेच्या मार्शल विद्यापीठाच्या एका मासिके छापून आला. आता या नवीन प्रजातीला ‘चिरोमॅचेट्स अगस्त्यामलाएनसीस’ असे नाव देण्यात आले आहे. मुख्य म्हणजे, अक्षय खांडेकर, तेजस ठाकरे, स्वप्निल पवार, सत्पाल गंगलमाले आणि विवेक वाघे यांनी या नवीन विंचवाच्या प्रजातीचा शोध लावला आहे.