सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात ज्या घडामोडी घडताहेत त्यावर सामान्य जनतेसोबत मराठी कलाकार मंडळी देखील वेगवेगळ्या प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. बुधवारी रात्री मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पद सोडण्याची भाषा केल्यानंतर राजकिय हालचालींना वेग आला आहे. मुख्य म्हणजे, उद्धव ठाकरेंच्या या भाषणानंतर अभिनेते किरण माने यांनी एक फेसबुक पोस्ट शेअर केली आहे.
या फेसबुक पोस्टमध्ये त्यांनी लिहिले आहे की, “अतिशय आत्मविश्वासानं, मनापासून बोलले! एवढं घडूनही ‘cool’ आहेत हे लै भारी. सत्तेसाठी तडफडणाऱ्या, आक्रस्ताळेपणा करणाऱ्या नेत्यांच्या तुलनेत हा बाणेदारपणा लैच भावला. सत्ता बळकावणाऱ्याला नाही, तर नीच वृत्तीपुढं न झुकणाऱ्याला इतिहास लक्षात ठेवतो”
https://www.facebook.com/1460418198/posts/pfbid02V8n5fPQeGXpytUnjKWeamdPQcZie6iSdFjmSkhssyijpBgDPzeZUYtkFEwbw7jxl/?app=fbl
यापूर्वी देखील किरण माने यांनी एका फेसबुक पोस्टच्या माध्यमातून महाराष्ट्रातील सध्याच्या राजकारणावर भाष्य केले आहे. यामध्ये त्यांनी, “लै हस्तोय च्यायाला….आमदार या पदाच्या अब्रूचा पार पंचनामा चाल्लाय, नाय नाय, या आधीबी बंडखोरी झालीय की महाराष्ट्रात. लै वेळा झालीय” असे म्हणले आहे.
पुढे बोलताना, “पन झालीय तवा खुलेआम झालीय. हितं मराठी मातीत रहाऊन. तोंडावर. स्वखुशीनं. पन ही काय अवस्था बघतोय! आरारारारा. भटकी जनावरं धरून कोंडवाड्यात भरावीत तशी अवस्था झालीय एकेकाची. त्या पत्रकारानं लाखात एक प्रश्न लाखात एक प्रश्न इचारलाय, “ऐसा क्या किया आपने जो आप भाग रहे है?”….ते आमदार गेलं खाली मान घालून. हाड तिच्यायला” अशा खोचक शब्दात त्यांनी सध्या स्थितीवर भाष्य केले आहे.
यानंतर त्यांनी, “आपून पाठीचा कना घिवून जन्माला आलोय भावांनो. काम काढून घेतलं तरी असल्या बांडगुंळांफुडं झुकलो नाय. तुरूंगात टाकलं तरी चालंल, जीव घेतला तरी चालंल, पन आईशप्पत अस्ली भयान अवस्था होऊन देनार नाय सोत्ताची…” असेही बोलून दाखविले आहे. सध्या त्यांचीही फेसबूक पोस्ट चांगलीच चर्चेत आली आहे.