शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे राज्यात राजकीय भूकंप झालाय. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी वर्षा बंगल्यावरुन आपला मुक्काम मातोश्रीवर हलवला आहे.
यावेळी मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंच्या स्वागतासाठी हजारो शिवसैनिक रस्त्यावर उतरले होते. तर दुसऱ्या बाजूला शिवसेनेचे आणखी ४ आमदार एकनाथ शिंदेंना जाऊन मिळाले आहेत.
यावर वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख Adv. प्रकाश आंबेडकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. एकनाथ शिंदेंनी आपल्या आमदारांसह भाजपमध्ये विलिन व्हावं अशी अट ठेवण्यात आल्याचा दावा प्रकाश आंबेडकरांनी केलाय.
प्रकाश आंबेडकर काय म्हणाले ?
“एकनाथ शिंदे यांच्यासोबत असणाऱ्या गटाने भाजपमध्ये विलीन व्हावे आणि मगच सरकार स्थापन होईल अशी अट भाजपने एकनाथ शिंदेंना घातली आहे ?” असं ट्विट प्रकाश आंबेडकरांनी केलं आहे.
एकनाथ शिंदे यांच्यासोबत असणाऱ्या गटाने भाजपमध्ये विलीन व्हावे आणि मगच सरकार स्थापन होईल अशी अट भाजपने एकनाथ शिंदेंना घातली आहे ?
— Prakash Ambedkar (@Prksh_Ambedkar) June 23, 2022
यामुळे प्रकाश आंबेडकरांनी केलेला दावा खरा ठरला तर नेमकं काय होणार ? याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.