एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. शिवसेनेच्या ३० पेक्षा जास्त आमदारांनी आपल्याच पक्षा विरोधात बंड पुकारल्याने शिवसेनेला हा मोठा धक्का आहे.
याच पार्श्वभूमीवर बोलत असताना शिवसेना खासदार संजय राऊत यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. यात राऊतांनी आपण महाविकास आघाडीतून बाहेर पडायला तयार असल्याचं म्हणलंय.
काय म्हणाले संजय राऊत ?
“तुम्ही २४ तासात परत या. तुम्ही परत या सरकारमधून बाहेर पडण्याबाबत विचार होईल. तुमचं म्हणणं ऐकून घेऊ. तुमच्या भूमिकेवर विचार करू” असं मत राऊतांनी व्यक्त केलंय. यामुळे महाराष्ट्रात आता नेमकं काय होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.