विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी असून शिवाजी विद्यापीठाने उन्हाळी सत्रातील परीक्षा MCQ पद्धतीने घेण्याचा निर्णय घेतला आहे. अभियांत्रिकी आणि विधी अभ्यासक्रमाची परीक्षा एमसीक्यू पद्धतीने होणार आहे.
विद्यापीठाने वेबसाईटवर परिपत्रक प्रसिद्ध करत याविषयीची माहिती दिली. मात्र इतर अभ्यासक्रमाच्या परीक्षांविषयी कोणतेही पत्रक काढण्यात आलं नाही. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यानी संताप व्यक्त केला आहे.
परिपत्रकानुसार विद्यार्थ्यांची ऑफलाईन पद्धतीने परीक्षा केंद्रावर MCQ परीक्षा घेतली जाणार असून प्रश्नपत्रिकेत प्रत्येकी दोन मार्कांचे 25 प्रश्न असणार आहेत.
मात्र विद्यार्थ्यांना ज्यादा वेळ, प्रश्नसंच यासारख्या मुभा मिळणार नसल्याचं देखील विद्यापीठ प्रशासनाने स्पष्ट केलं आहे.