सध्या शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी पक्षाविरोधात बंद पुकारल्यामुळे राजकीय वर्तुळात मोठ्या घडामोडी पाहिला मिळत आहेत. या सर्व वादात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपला बिस्तारा वर्षा बंगल्यावरून हलवला आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे पुढे जाऊन आपल्या पदाचा राजीनामा देखील देतील अशा चर्चांना महाराष्ट्रात उधाण आले आहे.
या सर्व पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात घडत असलेल्या घडामोडी पाहता बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्करने तिची प्रतिक्रिया दिली आहे. स्वराने एक ट्विट करत महाराष्ट्रातील स्थितीवर भाष्य केले आहे. तिने केलेल्या या ट्विटवर अनेकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.
स्वराने आपल्या ट्वीटमध्ये म्हणले की, “काय मूर्खपणा चालला आहे! आपण मत देतोच का… निवडणुकांऐवजी दर ५ वर्षांनी बंपर सेल लावा… #MaharashtraPoliticalTurmoil”, असे म्हणत स्वरा भास्करने महाराष्ट्रातील राजकारणावर परखड भाष्य केले आहे.
What an unrelenting s**tshow! Hum vote detey hi kyun Hain.. Elections ki jagah ‘Bumper Sale’ lagaa doh har 5 saal.. #MaharashtraPoliticalTurmoil
— Swara Bhasker (@ReallySwara) June 22, 2022
दरम्यान स्वरा सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या अभिनेत्रींमधील एक आहे. ती सतत देशात घडत असणाऱ्या घडामोडींवर भाषण करताना दिसते. यापूर्वी देखील तिने अनेक चर्चेत येणारी वक्तव्यं केली आहेत. सध्या तिचे महाराष्ट्रातील राजकारणावर केलेले वक्तव्य चर्चेत आले आहे.