मागील काही दिवसांत राज्यात राजकीय भूकंप झाला आहे. शिवसेना नेते एकनाथ शिंदे Eknath Shinde यांनी केलेल्या बंडामुळे शिवसेना पक्ष संकटात सापडलाय.
सध्या एकनाथ शिंदे शिवसेनेच्या आमदारांना घेऊन गुवाहाटी Guwahati येथे आहेत. तसेच त्यांच्यासोबत काही अपक्ष आमदार देखील आहेत. तर दुसऱ्या बाजूला उध्दव ठाकरे Udhhav Thackeray देखील शिवसेनेच्या विरोधात आक्रमक झाले आहेत. आपल्या सोबत ५० आमदार येतील असा दावा शिंदे गटाने केलाय.
याच पार्श्वभूमीवर एक मोठी माहिती समोर येत आहेत. एकनाथ शिंदे सध्या आसामवरून दिल्लीला रवाना झाले आहेत. विशेष म्हणजे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस Devendra Fadanvis देखील दिल्लीतच आहेत.
यामुळे दिल्लीत Delhi एकनाथ शिंदे फडणवीसांना भेटायला गेल्याचं स्पष्ट झालंय. मात्र एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात काय चर्चा होणार याकडे सर्वांचे लक्ष लागलंय.