फळबागांची शेती करणे हे शेतकऱ्यांसाठी फायदेशीर असते. पारंपरीक पीक पद्धतीला फाटा देऊन फळबाग लागवडीसाठी शेतकरी पुढे सरसावले आहेत. एकट्या महाराष्ट्रात 74 हजार हेक्टर क्षेत्रावर डाळिंब लागवड करण्यात आली आहे. पुणे, सोलापूर, अहमदनगर, सांगली, नाशिक या जिल्ह्यात डाळिंब शेती केली जाते.
डाळिंबाच्या जाती
डाळिंबाच्या अनेक जाती महाराष्ट्रात लावल्या जातात. त्यामध्ये भगवा आणि गणेश या दोन जातींची ( pomegranate varities) लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. डाळिंबाच्या उच्च उत्पादनासाठी खालील जातींची लागवड केली जाते.
1) गणेश : या जातीच्या डाळिंबाचे फळ आकाराने मोठे असते. त्यामुळे यातून सरासरी 8 ते 10 किलोचे उत्पादन भेटते. यामध्ये मोठ्या आणि लाल सालीचे मिश्रण पहायला मिळते.
2) कमान : गणेश जातीपेक्षा लहान असणारे हे फळ गडद लाल रंगाचे असते. यातून सुद्धा मोठ्या प्रमाणावर उत्पन्न मिळवता येते.
3) बहर: बहर जातीचे फळ त्याच्या वजनासाठी प्रसिद्ध आहे. त्याचे वजन 250 ते 300 ग्रॅम असते.
4) रुबी: रुबी ही प्रजाती आय आय एच आर बेंगलोर यांनी विकसित केली आहे. या फळाचे वजन 270 ग्रॅम इतके असून सरासरी उत्पादन 16 ते 18 टन प्रति हेक्टर आहे.
याशिवाय ढोलका, ज्योतिष मस्कत, मऊ या जातीची डाळिंबे शेतात लावली जातात.
डाळिंबाची जमीन
डाळिंब लागवड ही मुख्यतः पडीत, हलकी जमीन, दणकट जमीन आणि मुख्य म्हणजे पाण्याचा निचरा होणाऱ्या जमिनीत केली जाते. डाळिंब हे बहुवार्षिक पीक असून वर्षनुवर्षे याचे उत्पादन मिळत राहते.