सध्या महाराष्ट्रातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडामुळे शिवसेना पक्ष चांगलाच अडचणीत सापडलाय. कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना शिवसेनेत अनेक सामान्य कार्यकर्ते मोठे नेते झाले आहेत.
मात्र एकनाथ शिंदेंनी केलेलं बंड हे शिवसेनेतलं पहिल्ं बंड नाहीये. याआधी देखील मुंबईचे महापौर राहिलेल्या छगन भूजबळ, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिलेल्या नारायण राणे आणि राज ठाकरे यांनी शिवसेनेला रामराम ठोकलाय. या सर्वांनी पक्ष सोडल्यावर शिवसेना संपणार असं अनेकांना वाटलं होते. मात्र शिवसेना त्या जोमानं पुन्हा एकदा उभी राहिली.
पण मुंबईचे महापौर राहिलेल्या छगन भूजबळांनी शिवसेना का सोडली?
छगन भूजबळ हे शिवसेनेचे पहिल्या फळीतील नेते म्हणून त्यांची ओळख होती. एक सामान्य शिवसैनिक, मग शाखाप्रमुख आणि थेट मुंबईचे महापौर असा प्रवास छगन भूजबळ यांनी केलाय. भूजबळ १८८५ साली मुबंईचे महापौर झाले. पुढे १९८९ साली शिवेसेनेने हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून भाजपसोबत युती केली. इथेच अयोध्देतील राम मंदिराचा मुद्दा दोन्ही पक्षांनी लावून धरला. यामुळे १९९० च्या निवडणूकीत शिवसेनेच्या ५२ जागा निवडून आल्या.
यावेळी छगन भूजबळांना शिवसेनेचे विरोधी पक्षनेते पद हवं होते, पण बाळासाहेबांनी विरोधी पक्ष नेता केलं मनोहर जोशींना, यावेळी देखील भूजबळांचे शिवसेनेसोबत मतभेद व्हायला सुरुवात झाली होती. तसेच बाळासाहेब ठाकरेंचं टोकाचं हिंदुत्व भूजबळांना मान्य नव्हतं असं देखील बोललं जातं. यामुळे १९९१ साली भूजबळांनी नागपूर अधिवेशनाच्य़ा काळात ९ आमदारांना घेऊन कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. हा प्रवेश शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आला होता. या नंतर शिवसैनिकांनी भूजबळांच्या घरावर देखील हल्ला केला होता.
गृहमंत्री असताना छगन भूजबळ
१९९९ साली शरद पवारांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसची स्थापना केली. यावेळी छगन भूजबळ यांंनी देखील कॉंग्रेस सोडून राष्ट्रवादीच जाण्याचा मार्ग निवडला. या वर्षी महाराष्ट्रात राष्ट्रवादी कॉंग्रेसची सत्ता आली होती. यात भूजबळांना गृहमंत्री पद देण्यात आलं. याच काळात मुंबईत मोठ्या दंगली घडल्या.
या दंगलीसाठी बाळासाहेब ठाकरेंवर अनेक आरोप करण्यात आले होते. त्यावेळी राज्याचे गृहमंत्री होते छगन भूजबळ, यावेळी मुंबई दंगल प्रकरणी बाळासाहेबांना अटक करण्याचं फर्मान जेव्हा त्यांच्या खात्याने काढलं, तेव्हा महाराष्ट्रात राजकीय वादळ निर्माण झालं होतं. हजारो शिवसैनिक रस्त्यावर उतरून भूजबळांच्या विरोधात घोषणाबाजी करत होते. पण कोर्टानं बाळासाहेबांना दिलासा दिला आणि राज्यातील वातावरण शांत झालं.
मात्र छगन भूजबळ यांनी शिवसेना सोडली तेव्हा त्यांच्यासोबत केवळ ९ आमदार होते. मात्र एकनाथ शिंदेंसोबत शिवसेनेचे ३० पेक्षा जास्त आमदार आहेत. यामुळे शिवसेना आता संपणार अशी चर्चा सगळीकडे असली तरी शिवसेना पुन्हा एकदा नव्या जोमाने उभा राहिल एवढं मात्र नक्की