भारत विरुध्द इंग्लंड ऐतिहासिक कसोटी सामना १ जुलैला सुरु होत आहे. तर दुसऱ्या बाजूला भारताचा युवा संघ सध्या आयर्लंड दौऱ्यावर आहे. काल झालेल्या पहिल्या टी-२० सामन्यात भारतीय संघाने आयर्लंडवर विजय मिळवलाय.
खराब वातावरणामुळे सामना केवळ १२ षटकांचा खेळवण्यात आला होता. प्रथम फलंदाजी करत आयर्लंडने १०९ धावांचं लक्ष्य भारतासमोर ठेवलेलं.
इशान किशन आणि दिपक हुडा यांनी केलेल्या फटकेबाजीमुळे भारतीय संघाने ७ विकेट्सने सहज विजय मिळवला आहे. मात्र या सामन्यात कर्णधार हार्दिक पांड्याने नवा विक्रम आपल्या नावावर केलाय.
आयपीएलमध्ये केलेल्या दिमाखदार कामगिरीमुळे भारताच्या युवा संघाची जबाबदारी हार्दिककडे देण्यात आलीय. या सामन्यात हार्दिकने गोलंदाज करताना आयर्लंडच्या पॉल स्टर्लिंग याला बाद केले.
यात पहिल्याच टी-२० सामन्यात कर्णधार म्हणून विके्टस घेणारा हार्दिक हा पहिला टी-२० कर्णधार ठरलाय. यामुळे सर्वच स्तरातून हार्दिकचे कौतुक होताना दिसत आहे.