राज्यातील राजकारणातील सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. सर्वोच्च न्यायालयाने उद्याची बहुमत चाचणी रद्द करण्यास नकार दिल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणार असल्याची घोषणा केली आहे. तसेच आपण विधान परिषद सदस्यत्वाचा देखील राजीनामा देत असल्याचे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. मला पद नको तर जनतेचे प्रेम हवे असे उद्धव ठाकरे यांनी यावेळी म्हटले आहे. मी मुख्यमंत्री पदाचा त्याग करत आहे. मी फक्त शिवसेनेचीच धुरा सांभाळणार. असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.