मागील अनेक दिवसांपासून सुरु असलेल्या सत्तानाट्याला आज वेगळं वळण मिळाले, भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री असतील अशी घोषणा केल्याने अनेकांना धक्का बसला आहे.
काल उध्दव ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिल्यानंतर देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतील अशी शक्यता अनेकांनी वर्तवली होती. मात्र ऐनवेळी फडणवीसांनी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार असल्याचे जाहीर केले.
यावर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. शरद पवारांनी आणखी एक सातारकर महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झासा अशा शब्दांत एकनाथ शिंदेंचे अभिनंदन केले आहे.
काय म्हणाले शरद पवार ?
“श्री. एकनाथ शिंदे यांची महाराष्ट्र राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून निवड झाल्याबद्दल मनपूर्वक अभिनंदन! महाराष्ट्राच्या हिताची जपणूक त्यांच्याकडून होईल अशी सार्थ अपेक्षा व्यक्त करतो, स्व. यशवंतराव चव्हाण, श्री. बाबासाहेब भोसले, श्री. पृथ्वीराज चव्हाण यांच्यानंतर अजून एका सातारकरांची मुख्यमंत्रीपदी वर्णी लागली याचा आनंद आहे.” असं ट्विट करत शरद पवारांनी एकनाथ शिंदेंना शुभेच्छा दिल्या आहेत.
स्व. यशवंतराव चव्हाण, श्री. बाबासाहेब भोसले, श्री. पृथ्वीराज चव्हाण यांच्यानंतर अजून एका सातारकरांची मुख्यमंत्रीपदी वर्णी लागली याचा आनंद आहे.
— Sharad Pawar (@PawarSpeaks) June 30, 2022