यावर्षी मिस इंडिया 2022 चा किताब कर्नाटकच्या सिनी शेट्टीने पटकावला आहे. 3 जुलै रोजी मुंबईत पार पडलेल्या २०२२ च्या अंतिम फेरीत ३१ स्पर्धकांवर मात करत सिनीने ‘मिस इंडिया 2022’चा मुकूट आपल्या नावे केला आहे. त्यामुळे देशाला वर्षीची मिस इंडिया मिळाली आहे.
यावर्षी ‘मिस इंडिया 2022’ ची अंतिम फेरी मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये पार पडली. मिस इंडिया च्या अंतिम फेरीत राजस्थानची रुबल शेखावत फर्स्ट रनर अप, उत्तर प्रदेशची शिनाता चौहान दुसरी रनर अप ठरली. शेवटच्या फेरीत या तिघेही खूपच सुंदर दिसत होते.
सिनी शेट्टीसोबत शिनाता चौहान आणि रुबल शेखावत आघाडीवर होती. शेवटी सिनी शेट्टीला मिस इंडिया म्हणून घोषित करण्यात आले. यावेळी तीला मुकुट घालण्यात आला. या कार्यक्रमासाठी अनेक बॉलीवूड कलाकारांनी हजेरी लावली होती. तर परीक्षक म्हणून मलायका अरोरा, नेहा धुपिया, दिनो मोरिया, राहुल खन्ना, रोहित गांधी, शामक डाबर होता.
दरम्यान मिस इंडिया 2022 किताब आपल्या नावे करणारी सिनी शेट्टी फक्त 21 वर्षांची असून ती सध्या चार्टर्ड फायनान्स अॅनालिस्टचा कोर्स करत आहे. सिनी मूळचे कर्नाटकचे आहे. परंतु ती मुंबईत राहते. सिनीने आजवर अनेक कार्यक्रमांमध्ये सहभाग नोंदवला आहे. तिला डान्सची आवड सर्वात जास्त आहे.