सोशल मीडिया हा व्यक्त होण्याचा खूप मोठा प्लॅटफॉर्म आहे. यावर अनेकांना स्वतःतील कला दाखवण्याची संधी मिळते. सोशल मीडिया मुळे आज सामान्य माणूस देखील प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचत आहे. सध्याच्या काळात सोशल मीडिया प्लॅटफॉर्म मनोरंजनाचे साधन न राहता पैसे कमावण्याचा एक मार्ग निर्माण झाला आहे. इन्स्टाग्राम, फेसबुक, युट्युब यांच्या माध्यमातून लोक लखपती होताना पहायला मिळत आहेत. सोलापूर जिल्ह्यातील गणेश शिंदे यातीलच एक !
टिकटॉक बंद पडले म्हणून युट्यूब चॅनेल सुरू केले
सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ येथील गणेश शिंदे व त्यांच्या पत्नी टिकटॉक वरील प्रसिद्ध जोडपे होते. तेथे त्यांचे लाखो फॉलोवर्स (followers) होते. यावर गणेश आणि त्यांची पत्नी योगिता छोटे छोटे व्हिडिओ टाकायचे जे मोठ्या प्रमाणात व्हायरल व्हायचे. मात्र टिकटॉक वर बंदी आल्यानंतर गणेश यांनी दुसरं मीडिया प्लॅटफॉर्म शोधत युट्यूब चॅनेल ( youtube channel) सुरू केलं.
युट्युबमधून कमावले लाखो रुपये
सुरुवातीला गणेश यांना युट्यूब बद्दल फारशी माहिती न्हवती. परंतु माहिती काढून ते युट्यूबवर व्हिडिओ टाकत गेले. नंतरच्या काळात व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्यांचे युट्यूबचं चॅनल मॉनेटाईज झाले. यातून गणेश यांना पैसे मिळायला लागले. युट्यूब मधून मिळालेल्या पैशातून ( eraning from you tube) त्यांनी स्वतःचे घर व गाडी घेतली आहे.
कमेंटचा होतो त्रास
युट्यूबवरती व्हिडिओ टाकल्यानंतर गणेश व त्यांची पत्नी योगिता याना कमेंट्स चा मानसिक त्रास होतो. वाईट कमेंट्स मुळे खच्चीकरणही होते. यामुळे ते कमेंट्स कडे दुर्लक्ष करून चांगली माहिती लोकांपर्यंत पोहोचवतात.