ज्येष्ठ लेखक व कादंबरीकार अनंत खरे यांचे वयाच्या 76 व्या वर्षी निधन झाले आहे. त्यांच्या जाण्याने साहित्य क्षेत्रात एक पोकळी निर्माण झाली आहे. अनंत खरे दीर्घकाळापासून आजारी होते. त्यांच्या ‘उद्या’ या कादंबरीला २०२० चा साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला होता.
अनंत खरे यांच्या ‘अंताजीची बखर’, ‘बखर अंतकाळाची’ आणि ‘उद्या’ या त्यांच्या उल्लेखनीय साहित्यकृती आहेत. त्यांना साहित्य क्षेत्रात नंदा खरे या नावाने ओळखले जात होते. एक अभ्यासपूर्वक लेखक म्हणून अनंत खरे यांची ओळख होती. त्यांनी ‘उद्या’ या कादंबरीचा पुरस्कार स्वतःहून नाकारला होता. यावेळी त्यांनी, मला समाजाने आतापर्यंत खूप काही दिलं असल्याचे म्हणले होते.
त्यांच्या निधनामुळे क्षेत्रातील एक निस्पृह व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड गेले आहे. त्यांच्या निधनाच्या बातमीनंतर अनेकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. तसेच त्यांच्या जाण्यावर दुःख व्यक्त केले आहे.