कोणत्याही देशाचा विकास घडविण्याची संपूर्ण जबाबदारी तेथील सरकारवर असते. स्थापन झालेल्या या सरकारमध्ये राष्ट्रपती, पंतप्रधान आणि उपराष्ट्रपती ही तीन पदे प्रमुख भूमिकेत असतात. या तिन्ही पदांचा दर्जा देखील तितकाच मोठा असतो. त्यामुळे त्यांना देण्यात येणारे वेतन देखील त्यांच्या दर्जानुसारच मोठे असते. आज आपण याच तीन पदांसाठी देण्यात येणाऱ्या सुविधा आणि वेतनाविषयीची माहिती जाणून घेणार आहोत.
भारताचे राष्ट्रपती
भारताचे राष्ट्रपती हे भारताचे प्रथम नागरिक असतात. त्यामुळे त्यांना देण्यात येणाऱ्या सुविधा देखील तितक्यातच दर्जेदार असतात. राष्ट्रपती हे भारतीय सशस्त्र दलांचे कमांडर-इन-चीफ देखील असतात. भारताच्या राष्ट्रपतींना दरमहा पाच लाख रुपये वेतन मिळते. या वेतनावर कोणताही कर लादलेला नसतो. भारताचे राष्ट्रपती राष्ट्रपती भवनात राहतात. त्यांना हव्या त्या सर्व सुविधा मोफत पुरवल्या जातात.
भारताचे उपराष्ट्रपती
भारताचे उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे अध्यक्षही असतात. राष्ट्रपतींच्या गैरहजेरीत उपराष्ट्रपतींवर महत्त्वाच्या जबाबदाऱ्या असतात. त्यामुळे त्यांना वेतन आणि सुविधा देखील त्याच पद्धतीने दिल्या जातात. भारतात उपराष्ट्रपतींना सभापती म्हणून दरमहा चार लाख रुपये देण्यात येतात. तसेच त्यांना मोफत बंगला, मोफत वैद्यकीय सुविधा वेगवेगळे भत्ते दिले जातात. त्यांना सर्व सुविधा मोफत मिळतात.
भारताचे पंतप्रधान
2012 पासून भारतात पंतप्रधानांना सुमारे दरमहा 1 लाख 7 हजार रुपये वेतन मिळत आहे. पंतप्रधानांचे मूळ वेतन फक्त पन्नास हजार रुपये आहे. परंतु भत्ता ३००० रुपये, खासदार भत्ता ४५ हजार रुपये, दैनंदिन २,००० रुपये हे सर्व मिळून त्यांना १,६०,००० लाख रुपये देण्यात येतात. तसेच त्यांना राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपतींप्रमाणे मोफत बंगला, मोफत वैद्यकीय सेवा तसेच मोफत दैनंदिन सेवा उपलब्ध होतात.