२०१७ साली छत्तीसगडमधील Chhattisgarh बुरकापाल Burka Pal attack येथे झालेल्या हल्ल्यात सीआरपीएफचे CRPF २५ जवान शहीद झाले होते. या प्रकरणी पोलिसांनी माओवाद्यांना मदत केल्याच्या संशयावरून १२१ आदिवासींना अटक 121 Tribals arrested केली होती. हे प्रकरण न्यायालयात गेली ५ वर्षे सुरु होते, या प्रकरणी राष्ट्रीय तपास संस्थेच्या NIA न्यायालयाने पाच वर्षानंतर निकाल दिला आहे. दंतेवाडा Dantewada न्यायालयाने या सर्व १२१ आदिवासींना निर्दोष मुक्त केले आहे.
हे सर्व आदिवासी छत्तीसगडमधील बुरकापाल, ताडमेटला, कररी गुंडम, मेटगुडा, पेरमिली, तुमलापाडा, गोंडपल्ली आणि टोंगगुडा या गावांतून आलेले आहेत. या सर्वांवर पोलिसांनी यूएपीए UAPA शस्त्रास्त्र कायदा Arms Act आणि स्फोटक पदार्थ कायदा अंतर्गत गुन्हे दाखल केले होते.
अटक करण्यात आलेल्यांमध्ये ५ अल्पवयीन मुलांचा देखील समावेश होता. या ५ मुलांची २ वर्षांपूर्वी सुटका करण्यात आली होती. या प्रकरणात आतापर्यंत १०५ आदिवासींची सुटका करण्यात आली आहे. तर तिघांना १६ जुलै रोजी दंतेवाडा न्यायालयातून सोडण्यात आले. धक्कादायक बाब म्हणजे या अटक झालेल्यांपैकी दोडी मंगलूचा Dodi Mangalu २०२१ मध्ये तुरुंगात मृत्यू झाला होता.
दरम्यान, या केसचा निकाल देताना न्यायालयाने पोलिसांनी केलेल्या कारवाईवर ताशेरे ओढले आहेत. न्यायालयाने आपल्या निर्णयात म्हटले आहे की, असा कोणताही पुरावा किंवा साक्षीदार सापडला नाही, ज्यामुळे सर्व आरोपी हे कोणत्याही नक्षल संघटनेशी संबंधित आहेत किंवा ते कोणत्याही प्रकारच्या गुन्ह्यात सामील असल्याचे सिद्ध करू शकतील. पोलिसांनी जप्त केलेली शस्त्रे या आरोपींची नाहीत, असेही न्यायालयाने म्हटले आहे.