देशात ट्रान्सजेंडर व्यक्तींना नेहमीच दुय्यम वागणूक दिली जाते. ट्रान्सजेंडर व्यक्तींसोबत अन्याय झालेल्या अनेक घटना समोर येत असतात. तसेच मालिका, वेब सिरीज, चित्रपटात देखील ट्रान्सजेंडर समुहाला नेहमी भीक मागणे किंवा सेक्स वर्कर अशा भूमिका करताना दाखवलं जातं.
याच पार्श्वभूमीवर प्रिया बाबू Priya Babu यांनी तामिळनाडूमध्ये भारतातील पहिली ट्रान्सजेंडर पुस्तक प्रकाशन आणि चित्रपट कंपनी उघडली आहे. ही देशातील ट्रान्सजेंडर व्यक्तीने स्थापन केलेली देशातील पहिली प्रकाशन संस्था आणि चित्रपट कंपनी आहे. India’s first transgender book publishing House and film company
प्रिया बाबू २०१४ पासून ट्रान्सजेंडर व्यक्तींसाठी काम करत आहेत. आजवर त्यांनी अनेक पुस्तकं देखील लिहिली आहेत. या धर्तीवर आता त्या चित्रपट क्षेत्रात देखील पदार्पण करत आहेत.
प्रिया दिग्दर्शक आणि प्रकाशक म्हणून तिचा नवा प्रवास सुरू करत आहे. कारण ‘साहित्य आणि चित्रपटांमध्ये ट्रान्सजेंडरच्या भूमिकेचे चुकीचे वर्णन केले जाते’ असे त्यांचे मत आहे. मागील काही वर्षाच प्रिया बाबू यांनी ट्रान्सजेंडर व्यक्तींसाठी चालवली जाणारी देशातील पहिली लायब्ररी सुरु केली होती.
दरम्यान, प्रिया बाबू यांनी ‘ट्रान्स फिल्म्स’ Trance film नावाच्या फिल्म कंपनीचा स्थापना केली आहे. मागील ५ वर्षांपासून त्या यासाठी काम करत होत्या. अखेर आता या वर्षी कंपनीची नोंदणी झाली.
प्रिया बाबू सांगतात की, “आम्ही चित्रपटाचे वेळापत्रक तयार केले आहे. शूटिंग लवकरच सुरू होणार आहे. हा चित्रपट ट्रान्सजेंडर्सच्या इतिहासावर आधारित आहे. हा चित्रपट 400 जमीन घेणार्या ट्रान्सवुमनच्या जीवनावर आधारित आहे.