एकनाथ शिंदे Eknath Shinde यांनी केलेल्या बंडामूळे शिवसेना Shivsena हा पक्ष चांगलाच अडचणीत सापडला आहे. उध्दव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला तर शिवसेनेचे निम्म्यापेक्षा जास्त आमदार आणि खासदार शिंदे गटात सामील झाले आहेत.
ADVERTISEMENT
या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे पाक्षिक सामनावर खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची मुलाखत Udhhav Thackeray Interview प्रकाशित करण्यात आली आहे. यावर उध्दव ठाकरेंनी पुन्हा एकदा शिंदे गटावर निशाना साधला आहे.
उध्दव ठाकरेंचे मुलाखतीमधील प्रमुख मुद्दे
ADVERTISEMENT
- प्रत्येकाला आई-वडील असतात. मला माझ्या आई-वडीलांबद्दल आदर आहे तसा प्रत्येकाला असला पाहिजे. त्यांनी स्वत:च्या आई-वडिलांचे फोटो लावावेत आणि मतं मागावी
- बाळासाहेबांनंतर शिवसेना उभी केली हेच त्यांच्या पोटात दुखतंय. त्यांना शिवसेना आणि ठाकरे वेगळे करायचे आहेत
- माझं आव्हान आहे की ठाकरे आणि शिवसेना हे नातं तोडून दाखवाच. मात्र ते करताना माझ्या वडिलांचा फोटो लावून मतं मागू नका
- माझ्या वडिलांच्या फोटोचा, नावाचा आधार घ्यावा लागतो याचा अर्थ काय की तुमच्यात कर्तृत्व नाही. तुमच्यात हिंमत नाही. तुम्ही मर्द नाही आहात
- तुम्ही विश्वासघातकी आहात. माझा तर विश्वासघात केला पण लोकांचा विश्वासघात करताना बाळासाहेबांच्या नावाने संभ्रम कशाला निर्माण करताय. तुमचा मर्दाचा चेहरा घ्या समोर आणि मागा मतं
- भाजपाला स्वत:चे आदर्श निर्माण करता आले नाहीत, बाळासाहेब हे स्वत:चे म्हणून लोकांसमोर आणायचे. आपल्याकडून काही आदर्श निर्माण नाही झाला तर पक्ष फोडतायत तसे आदर्श पळवायचे