Uddhav Thackeray उद्धव ठाकरेंच्या आत्या त्यांना लहानपणी श्रावणबाळ म्हणायच्या. त्याचं कारणही तसंच आहे. उद्धव ठाकरेंचा स्वभाव लहानपणापासून अतिशय शांत असून ते फारसे चिडत नाहीत. लहानपणी त्यांचं टोपणनाव डिंगा Dinga असं होतं. पण राज ठाकरेंची Raj Thackeray मोठी बहीण जयवंती Jayvanti त्यांना दादू म्हणायला लागल्या. म्हणून राज ठाकरेही त्यांना दादू म्हणायचे. पण त्यांची इतर भावंड मात्र त्यांना डिंगूदादा असं म्हणत.
उद्धव यांचे पूर्ण नाव उद्धव बाळासाहेब ठाकरे Balasaheb Thackeray आहे. उद्धव यांचा जन्म 27 जुलै 1960 रोजी झाला. 2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर ते राज्याचे 19 वे मुख्यमंत्री Maharashtra Chief Minister बनले तसेच ते त्यांच्या शिवसेनेचे पक्षप्रमुख देखील बनले होते. उद्धव ठाकरे हे शिवसेनेचे संस्थापक बाळासाहेब ठाकरे यांचे पुत्र आहेत. त्यांच्या आईचे नाव मीनाताई ठाकरे Meenatai Thackeray. उद्धव ठाकरे यांनी जेजे स्कूल ऑफ आर्ट्समधून JJ School of Arts पदवी प्राप्त केली आहे.
उद्धव ठाकरे यांची राजकीय कारकीर्द
2002 च्या मुंबई महानगरपालिका Mumbai MNC निवडणुकीत उद्धव यांना पक्षाचे प्रचार प्रभारी बनवण्यात आले होते. या निवडणुकीत शिवसेनेने Shivsena चांगली कामगिरी केली. 2003 मध्ये त्यांना शिवसेनेचे कार्याध्यक्ष बनवण्यात आले. 2006 मध्ये शिवसेनेत फूट पडली होती. उद्धव यांचे चुलत भाऊ राज ठाकरे यांनी शिवसेना सोडून महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा स्वतःचा पक्ष स्थापन केला. 2012 मध्ये बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर 2013 मध्ये उद्धव यांची पक्षाच्या अध्यक्षपदी निवड झाली.
उद्धव यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने NDA एनडीएसोबत राहून 2014 मध्ये महाराष्ट्रात सत्ता मिळवली. 2019 मध्ये उद्धव यांनी एनडीएसोबतचे जुने नाते तोडून राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत महाविकास आघाडीची Mahavikas Aghadi स्थापना केली. या आघाडीने राज्यात सरकार स्थापन केले आणि उद्धव मुख्यमंत्री झाले.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होण्यापूर्वी उद्धव ठाकरे यांनी कोणतेही घटनात्मक पद भूषवले नव्हते. दरम्यान, राजकीय संकटानंतर, 28 नोव्हेंबर 2019 रोजी त्यांनी महाराष्ट्राचे 19 वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. महाविकास आघाडीच्या अध्यक्षपदीही त्यांची निवड झाली. 2021 मध्ये देशातील 13 राज्यांमध्ये सर्वाधिक चर्चेत असलेले मुख्यमंत्री Popular Chief Minister म्हणून उद्धव ठाकरे यांची निवड करण्यात आली होती.
उद्धव ठाकरे यांचे वैयक्तिक आयुष्य
उद्धव ठाकरेंना राजकारणापेक्षा फोटोग्राफीची Uddhav Thackeray Photography आवड, वडिलांच्या आदेशावरून ते राजकारणात झाले सक्रीय झाले. उद्धव यांना फोटोग्राफीमध्ये खूप रस आहे. 2004 मध्ये त्यांनी जहांगीर आर्ट गॅलरीत महाराष्ट्रातील किल्ल्यांच्या अनेक छायाचित्रांचे प्रदर्शन भरवले होते. 2010 मध्ये महाराष्ट्र देशा आणि 2011 मध्ये पहावा विठ्ठल हे छायाचित्र Uddhav Thackeray Book पुस्तकही त्यांनी प्रकाशित केले.
उद्धव ठाकरे कुटुंब
उद्धव ठाकरे यांचा विवाह रश्मी ठाकरे Rashmi Thackeray यांच्याशी झाला होता. उद्धव ठाकरे यांना आदित्य आणि तेजस ही दोन मुले आहेत. रश्मी ठाकरे सामनाच्या Samana संपादक आहेत. रश्मी या माधव पाटणकर यांची मुलगी आहे. पाटणकर हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सदस्य राहिले आहेत.
रश्मी ठाकरे यांची राज ठाकरेंची बहीण जयवंती हिच्याशी मैत्री होती आणि याच कारणामुळे त्या उद्धव यांच्या संपर्कात आली. दोघांनी 1989 मध्ये लग्न केले. उद्धव ठाकरे यांचा मोठा मुलगा आदित्य ठाकरे Aditya Thackeray हे शिवसेनेची विद्यार्थी संघटना असलेल्या युवा सेनेचे अध्यक्ष आहेत. महाविकास आघाडी सरकारमध्ये त्यांनी पर्यावरण मंत्री म्हणून काम पाहिले आहे.