यंदा भारताला स्वातंत्र्य Independence मिळून ७५ वर्ष पूर्ण होत आहेत. १५ ऑगस्ट १९४७ साली भारताला इंग्रंजाकडून British Rule स्वातंत्र्य मिळाले. देशाचा स्वातंत्र दिन हा १५ ऑगस्ट १९४७ आहे असं आपण मानतो. मात्र देश १९४७ च्या आधी १७ वर्षापूर्वी देशात १९३० साली देशात पहिला स्वातंत्र्य दिन साजरा First Independence Day करण्यात आला होता.
पार्श्वभूमी | 2 January 1930
२ जानेवारी १९३० रोजी लाहोर Congress session in Lahore येथे कॉंग्रेसचे अधिवेशन पार पडले. या अधिवेशनात इंग्रजांनी भारताला डोमिनियन राज्याचा दर्जा द्यावा अन्यथा भारत देश स्वत:ला पूर्णपणे स्वातंत्र्य असल्याचे घोषित करेल, असा ठराव मंजूर करण्यात आला. मात्र आपल्या मुजोर वृत्तीमुळे इंग्रजांनी कॉंग्रेसची ही मागणी काही मान्य केली नाही. यामुळे २६ जानेवारी १९३० हा दिवस स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करण्याच ठराव कॉंग्रेसच्या बैठकीत मंजूर झाला.
जानेवारी १९३० चा शेवटचा रविवार स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करण्याचा ठराव लाहोरमध्ये काँग्रेसचे वार्षिक अधिवेशनात झाला होता. तिथेच नेहरूंची Jawaharlal Nehru राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष National Congress President म्हणून निवड झाली. राष्ट्रीय चळवळीतील नेहरूंच्या वाढत्या लोकप्रियतेचे ते द्योतक होते.
२६ जानेवारी १९३० | स्वातंत्र्य दिन
कॉंग्रेस अधिवेशनात ठरल्याप्रमाणे २६ जानेवारी १९३० ला देशभरात स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला. १९३० नंतर प्रत्येक वर्षी काँग्रेसजनांनी २६ जानेवारी हा स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा केला. महात्मा गांधींनी ‘यंग इंडिया’ Young India Magazine या आपल्या नियतकालिकात हा दिवस कसा साजरा करावयाचा याचा आराखडा जाहीर केला होता.
त्यात महात्मा गांधींनी Mahatma Gandhi म्हटले होते की, “संपूर्ण खेड्याने स्वातंत्र्याची जाहीर घोषणा केली तर उत्तमच होईल. अगदी संपूर्ण शहरांनीसुद्धा तशी घोषणा करावी. संपूर्ण देशात, सर्व ठिकाणी अगदी एकाच वेळी स्वातंत्र्य घोषित करणाऱ्या सभा झाल्या तर फारच चांगले. सर्व ठिकाणी पारंपरिक पद्धतीने ढोल वाजवून सभेचा समय जाहीर करावा, • राष्ट्रीय झेंडा फडकावून सर्व समारोह सुरू करावेत, उर्वरित दिवस काही ना काही विधायक कार्यात व्यतीत करावा. म्हणजे सूत कातावे किंवा अस्पृश्यसेवा करावी किंवा हिंदू-मुस्लिम ऐक्यासाठी कार्य करावे. दारूबंदीसाठी काम करावे किंवा है सर्वच एकत्रितपणे करावे आणि ते काही अशक्य नाही.” असा गांधीजींनी सुचविलेला कार्यक्रम होता.
पंडीत जवाहरलाल नेहरू | Pandit Jawaharlal Nehru
पंडीत जवाहरलाल नेहरूंनी आपल्या आत्मचरित्रात Autobiography of Pandit Jawaharlal Nehru २६ जानेवारी १९३० हा स्वातंत्र्य दिन कसा होता याचे वर्णन केले आहे. “स्वातंत्र्य-दिन ठरला आणि एकाएकी लख्ख प्रकाश पडावा तशी संपूर्ण देशाची उत्फुल्ल मानसिकता डोळ्यासमोर उभी राहिली. सर्वत्र प्रचंड जनसमुदाय एकत्र होत होते आणि ते दृश्य अतिशय प्रभावित करणारे होते. शांततामय वातावरणात, धीरगंभीरपणे, भाषणबाजी न करता तसेच उन्माद न चढवता लोक स्वातंत्र्याची शपथ घेत होते. दुसऱ्या दिवशी वृत्तपत्रांना दिलेल्या निवेदनात नेहरूंनी अत्यंत आदराने देशभर यशस्वी आणि धीरगंभीर निदर्शने केल्याबद्दल राष्ट्राचे अभिनंदन केले. ‘खेडी आणि शहरे यांची स्वातंत्र्याप्रती आपला उत्साह आणि दृढता दाखविण्याची जणू अहमहमिकाच लागली होती. मुंबई आणि कलकत्त्यात महाप्रचंड समुदाय एकत्र आलेच, पण छोट्या छोट्या शहरांतूनही खूप मोठ्या प्रमाणावर लोक जमा झाले होते.”
पण प्रत्यक्षात ब्रिटिश जेव्हा या उपखंडातून चालते झाले तेव्हा त्यांनी १५ ऑगस्ट १९४७ हा दिवस निश्चित केला. ही तारीख त्यावेळचे भारताचे व्हाइसरॉय लॉर्ड माउंटबॅटन Viceroy Lord Mountbatten यांनी निवडली होती. दुसऱ्या महायुद्धात जपानने मित्रराष्ट्रांपुढे शरणागती पत्करल्याचा तो दुसरा वर्धापन दिन होता.
तसेच इंग्रंज जाण्याआधी भारताचा स्वातंत्र्य दिन हा २६ जानेवारी 26 January Republic Day दिवशी साजरा केला जायचा यामुळे भारतीय प्रजासत्ताक दिनाची तारीख २६ जानेवारी निश्चित करण्यात आली.