येत्या रक्षाबंधनच्या दिवशीच बॉलीवूड अभिनेता अक्षय कुमारचा रक्षाबंधन चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. परंतु त्यापूर्वीच हा चित्रपट सोशल मीडियावर वादाचे कारण बनला आहे. सध्या या चित्रपटाला नेटकरी मोठ्या प्रमाणात ट्रोल करताना दिसत आहेत. त्यामुळे चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच रक्षाबंधनच्या टीमच्या चिंतेत वाढ झाली आहे.
गेल्या काही दिवसांपासून अभिनेता आमीर खानच्या लाल सिंग चढ्ढावर देखील नेटकरी टीका करताना दिसत आहेत. या चित्रपटाविरोधात सोशल मीडियावर बहिष्काराचा ट्रेंड सुरु आहे. त्यानंतर आता अक्षय कुमारच्या रक्षाबंधनवर देखील अनेकांनी आक्षेप घेतला आहे. सध्या सोशल मीडियावर या चित्रपटाविरोधात #BoycottRakshaBandhanMovie असा ट्रेंड चालविला जात आहे.
#BoycottLaalSinghChaddha#BoycottLaalSinghChadha is our basic request but the main problem is with the #Bollywood so lets trend it #BoycottbollywoodForever #BoycottRakshaBandhanMovie #BoycottLaalSinghChaddha #BoycottBollywood #supportkarthiyeke pic.twitter.com/16rgsBu36q
— Ankit Pandit (@ankitofficiall) August 3, 2022
रक्षाबंधन चित्रपट हा एका पाकिस्तानी चित्रपटाची कॉपी असल्याचे अनेकांनी म्हटले आहे. पाकिस्तानी चित्रपटाचीच कथा या रक्षाबंधन चित्रपटात दाखवण्यात आल्याचा आरोप नेटकऱ्यांनी केला आहे. मात्र यावर उत्तर देताना, “चित्रपट न पाहताच कोणत्याही प्रकारचे आरोप करुन चित्रपटाविषयी अपप्रचार करु नये असे” चित्रपटाची लेखिका कनिका ढिल्लोन यांनी म्हणले आहे.
#BoycottRakshaBandhanMovie and don't forget #BoycottLaalSinghChaddha too@KanikaDhillon #KanikaDhillon tell the left wingers to watch the movie.
Jai shree ram 🔥❤️🔥 pic.twitter.com/zn4yCcqwGH— Ravi Yadav (@RaviYad12239153) August 3, 2022
दरम्यान रक्षाबंधन चित्रपटात अक्षय कुमारसोबत भूमी पेडणेकर, शेजमीन कौर मुख्य भूमिकेत आहे. त्यामुळे एकीकडे चाहत्यांनी हा चित्रपट पाहण्यासाठी उत्सुकता दाखवली आहे. तर दुसरीकडे या चित्रपटावर वाड्मय चोरल्याचा आरोप नेटकऱ्यांनी केला आहे. त्यामुळेच सिनेमागृहात चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच तो सोशल मीडियावर वादाचे कारण बनला आहे