तामिळनाडूच्या पेरीयेरी Periyari गावातील एका मंदिरात अनेक वर्षांपासून थलायवेट्टी मुनिप्पन Thalaivetty Munippan. नावाच्या हिंदू देवतेची पूजा केली जात होती.
या विरोधात २०११ साली एका बौद्ध ट्रस्टने ही मूर्ती गौतम बुद्धाची Gautama Buddha असल्याचा आक्षेप घेत याचिका दाखल केली होती. यावर ही मुर्ती बुध्दाचीच असल्याचा निर्णय मद्रास हायकोर्टाने Madras High Court दिले आहे.
यावेळी बोलताना न्यायमूर्ती एन आनंद व्यंकटेश Justice N Anand Venkatesh म्हणाले की, “पुरातत्व आणि तमिळ विकासविभाग या मालमत्तेचा ताबा घेतील आणि तो तसाच ठेवेल. मालमत्तेच्या आतील शिल्पाला बुद्ध म्हणून चित्रित करण्यासाठी आत एक बोर्ड लावला जाईल. सामान्य लोकांनाही या ठिकाणी जाण्याची परवानगी दिली जाऊ शकते आणि हे सुनिश्चित केले जाईल की बुद्धाच्या शिल्पासाठी कोणतीही पूजा किंवा इतर समारंभ करण्याची परवानगी नाही,”
दरम्यान हा ऐतिहासिक विजय मानला जात आहे. या निर्णयाचे देशातील सर्व स्तरातून स्वागत होत आहे.
The statue of Lord Buddha was being worshipped as Hindu deity Muniappan in TN's Salem. A Buddhist trust challenged this in the Madras HC in 2011.
The HC accepted the fact and ordered to restore the temple and stop the Hindu rituals there. This is a historic victory. pic.twitter.com/r08fHp4MTf
— Mission Ambedkar (@MissionAmbedkar) August 1, 2022
मिशन आंबेडकर यांनी ट्विट केले की, “टीएनच्या सेलममध्ये भगवान बुद्धांच्या मूर्तीची हिंदू देवता मुनिप्पन म्हणून पूजा केली जात होती. एका बौद्ध ट्रस्टने 2011 मध्ये मद्रास हायकोर्टात याला आव्हान दिले होते. हायकोर्टाने वस्तुस्थिती स्वीकारली आणि मंदिराचा जीर्णोद्धार करण्याचे आणि तेथील हिंदू विधी थांबवण्याचे आदेश दिले. हा ऐतिहासिक विजय आहे.” दरम्यान