रविवारी आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महासंघाच्या उपाध्यक्षपदी भारतीय बुद्धिबळपटू विश्वनाथन आनंद यांची निवड करण्यात आली आहे. तर विद्यमान अध्यक्ष आर्केडी वोर्कोविच यांना दुसऱ्यांदा अध्यक्षपदावर बसण्याचा मान मिळाला आहे. या पदासाठी जागतिक बुद्धिबळ संघटनेच्या फिडे काँग्रेसदरम्यान निवडणुका पार पडल्या होत्या.
यावेळी आर्केडी वोर्कोविच यांना एकूण 157 मते मिळाले. तर त्यांचे प्रतिस्पर्धी असणाऱ्या आंद्री बॅरीशपोलेट्स फक्त 16 मते मिळाली. मुख्य म्हणजे, या मतदानात सहभागी झालेले पाच जण गैरहजर होते. मतदानावेळी एक मत अवैध ठरविण्यात आले. विश्वनाथन आनंद हे पाच वेळा विश्वविजेते ठरले आहेत.
त्यांच्या नावे विश्व जूनियरचे खिताब देखील आहे. आनंद हे बुद्धिबळाच्या जागतिक मंचावर भारताचे प्रतिनिधित्व करत आहेत. निवडणुकीदरम्यान ते ड्वोरकोविचच्या संघाचा भाग होते. आता त्यांची आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महासंघासाठी उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.