नव्या सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार हा प्रश्न संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेला पडला आहे. परंतु आता या प्रश्नाचे उत्तर आता जनतेला मिळालेले दिसत आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, येत्या 9 ऑगस्ट रोजी म्हणजेच उद्या सकाळी 11 वाजता काही मंत्र्यांचा शपथविधी सोहळा पार पडू शकतो. यावेळी 10 ते 12 मंत्री शपथ घेतील अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
मंत्रिमंडळ विस्ताराच्या प्रश्नावर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची बैठक पार पडली आहे. या बैठकीत पावसाळी अधिवेशनाचा आढावा घेण्यात आला. मुख्य म्हणजे याच बैठकीत मंत्रिमंडळ विस्ताराची तारीख आणि दिवस ठरविण्यात आला आहे. त्यानुसार, सर्व बाबी जुळून आल्या तर आज रात्रीच शपथविधी होऊ शकतो.
मुख्य म्हणजे नवीन सरकार स्थापन होऊन 38 दिवस उलटून गेले आहेत. मात्र अद्याप मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यासाठी राज्य सरकारला मुहूर्त मिळालेल्या नाही. त्यामुळे विरोधी पक्षनेते राज्य सरकारवर जोरदार टीका करताना दिसत आहेत. या सर्व बाबी लक्षात घेऊनच शिंदे सरकारने या आठवड्यातच मंत्रिमंडळाचा विस्तार करण्याचा निर्णय घेतला आहे.