पत्राचाळ घोटाळा प्रकरणी संजय राऊत यांना ईडी कडून अटक करण्यात आली असून त्यांची कोठडी 8 ऑगस्टपर्यंत वाढविलेली आहे. अस असतानाच शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामना मधून रविवारी संजय राऊत यांचा लेख रोखठोक या सदरात प्रकाशित झालेला आहे. यावरूनच मनसे नेते संदीप देशपांडे यांनी कोठडीत असताना त्यांनी लेख लिहिला कसा असा सवाल उपस्थित केलेला आहे.
ईडीचे अधिकारी यांनी राऊत यांनी लेख कसा लिहिला याची चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती दिलेली आहे. तुरुंगात असताना कोणतीही व्यक्ती लेख लिहू शकत नाही आणि जर लेख लिहायचा असेल तर त्यासाठी न्यायालयाची विशेष परवानगी घेणे गरजेचे असते. न्यायालयाची विशेष परवानगी मिळाली तरच लेख लिहिता येतो यामुळे याची आता ईडीकडून चौकशी करण्यात येणार आहे.
दरम्यान, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर या लेखाच्या माध्यमातून संजय राऊत यांनी सडकून टीका केलेली आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी काही दिवसांपूर्वी मुंबईमधून जर राजस्थानी आणि गुजराती लोक गेले तर मुंबई आणि महाराष्ट्रात पैसा शिल्लक राहणार नाही असे भाष्य केले होते यामुळे अनेक स्तरांतून त्यांच्यावर जोरदार टीका करण्यात येत होती.
यावरूनच आता खासदार संजय राऊत यांनी जेव्हा मराठी उद्योजक साखर कारखाने, गिरण्या आणि इतर उद्योग चालवण्याचा प्रयत्न करतो तेव्हा ईडी त्यांच्यावर कारवाई करते ईडीच्या करवाईचा फास त्याच्याभोवती आवळला जातो यावर देखील राज्यापालांनी काहीतरी बोलायला हवं, अस रोखठोक मध्ये म्हटलेल आहे.