मराठी चित्रपट सृष्टीतील प्रसिध्द अभिनेते प्रदिप पटवर्धन यांच निधन झालं आहे. Pradeep Patwardhan प्रदिप पटवर्धन यांचं ह्दयविकाराच्या झटक्याने निधन झाल्याचे प्राथमिक माहितीत समोर आलंय.
प्रदिप पटवर्धन हे मराठी सिनेसृष्टीतील प्रसिध्द अभिनेते आहे. मागील अनेक वर्षे त्यांनी मराठी रंगभूमी, चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलंय. मात्र त्यांच्या निधनाने मराठी सिनेसृष्टीला मोठा धक्का बसलाय.
प्रदिप पटवर्धन यांची ‘मोरूची मावशी’ हे नाटक चांगलंच गाजलं होते, हे नाटक गेली अनेक वर्षे मराठी रंगभूमीवर हाऊसफुल ठरत होते. यामुळे मराठी प्रेक्षकांनी मोरूची मावशी या नाटकासाठी प्रदिप पटवर्धन यांना प्रेक्षकांनी विशेष प्रेम दिले होते.
दरम्यान, नवरा माझा नवसाचा, चश्मे बहाद्दर, एक दोन तीन चार, लावू का लाथ, भुताळलेला, नवरा माझा भवरा, डोम, मी शिवाजी राजे भोसले बोलतोय, जमलं हो जमलं, एक शोध अशा अनेक लोकप्रिय मराठी चित्रपटांमध्ये पटवर्धन यांनी दर्जेदार भूमिका केली आहे.