महाराष्ट्राचे नवे उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतल्यानंतर त्यांच्यावर केंद्राने देखील आता मोठी जबाबदारी सोपवली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देवेंद्र फडणवीसांना केंद्रात स्थान देत त्यांची भाजपाच्या केंद्रीय निवडणूक समितीत सदस्य म्हणून निवड केली आहे. त्यामुळे आता फडणवीसांना महाराष्ट्रासोबत देशाही जबाबदारी चोखपणे पार पाडावी लागणार आहे.
आज भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी केंद्रीय निवडणूक समितीची घोषणा आहे. यामध्ये त्यांनी भाजपच्या 15 बड्या नेत्यांना केंद्रीय निवडणूक समितीत घेतले आहे. यामध्ये देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत, बीएस येडीयुरप्पा, सर्वानंद सोनोवाल, के.लक्ष्मण यांचा नव्याने समावेश करण्यात आला आहे.
या समितीच्या अध्यक्षपदी जेपी नड्डा आहेत. तर सदस्यपदी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, बीएस येडीयुरप्पा, सर्वानंद सोनोवाल, के.लक्ष्मण, इकबाल सिंह लालपुरा, सुधा यादव, सत्यनारायण जटिया, भुपेंद्र यादव, देवेंद्र फडणवीस, ओम माथुर, श्रीमती वनथी श्रीनिवास हे सर्वजण आहेत.
आता या सर्वांनी पूर्ण विचार करून देवेंद्र फडणवीस यांच्यावर ही महत्त्वाची जबाबदारी सोपवली आहे. त्यामुळे आता देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रासोबत देशाची देखील जबाबदारी पार पाडणार आहे. आता केंद्रीय निवडणूक समितीत फडणवीस यांना स्थान मिळाल्यामुळे सध्या फडणवीस चांगलेच चर्चेत आले आहेत.