उदयनराजे भोसले हे नेहमीच काही ना काही कारणाने चर्चेत असतात, मागील काही दिवसांत शिवेंद्रराजे आणि उदयनराजे यांच्यातील युध्दामुळे दोघेही चांगलेच चर्चेत होते.
मात्र आता उदयनराजे एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आले आहे, उदयनराजेंचा आपल्या कार्यकर्त्याला तोंडाने पेढा भरवतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
नेमकं काय घडलं ?
उदयनराजे भोसले नेहमी आपल्या कार्यकर्त्यांच्या वाढदिवस आणि कार्यक्रमांना हजेरी लावून आपल्या स्टाईलमध्ये शुभेच्छा देतात. साताऱ्यातील गोडोली येथे काल उदयनराजे हे विनोद मोरे वाढदिवसा निमित्त उपस्थित होते. यावेळी विनोद मोरेंचं कौतुक करण्यासाठी उदयनराजेंनी त्यांना चक्क तोंडाने पेढा भरवला. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
उदयनराजेंनी तोंडाने कार्यकर्त्याला पेढा भरवला.#SaamanaOnline #UdayanRajeBhosale #ViralVideo #Maharashtra pic.twitter.com/5V1tKkNRcn
— Saamana (@SaamanaOnline) August 17, 2022