भारत पाकिस्तान क्रिकेट सामन्याची प्रतिक्षा जगभरातील क्रिकेट चाहत्यांना लागलेली असते. या धर्तीवर काल आशिया कपमधील भारत पाकिस्तान सामना पार पडला.
शेवटच्या षटकापर्यंत चाललेल्या या सामन्यात भारताने 5 विकेट्सने विजय मिळवला. हार्दिक पांड्याने षटकार मारत भारताचा या सामन्यात विजय मिळवून दिला. यामुळे देशभरात विजयोत्सव साजरा केला जात आहे.
मात्र हा सामना आणखी एका कारणाने चर्चेत आला आहे. देशाचे गृहमंत्री अमित शाह यांचे सुपुत्र जय शाह हे BCCI चे सचिव आहे. कालच्या सामन्यावेळी जय शाह देखील उपस्थित होते.
Antinational #JayShah #INDvsPAKpic.twitter.com/jbGnzj02sA
— Shubhra (@shubhshaurya1) August 28, 2022
सामना जिंकल्यावर स्टेडियममधील सर्वांनी विजयाचा जल्लोष केला. यात जय शाह देखील उभा राहिले होते. यावेळी त्यांच्या एका सहकाऱ्याने जय शाह यांच्या हातात तिरंगा दिला मात्र त्यांनी तिरंगा घेण्यास नकार दिला. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून अनेकांनी यावर टिका केली आहे.