एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडामुळे शिवसेना पक्ष अडचणीत सापडला होता. मात्र आदित्य ठाकरे यांनी काढलेल्या यात्रेला शिवसैनिकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे.
यामुळे शिवसेना पुन्हा एकदा जोमाने मैदानात उतरली आहे. या धर्तीवर मागील आठवड्यात शिवसेनाप्रमुख उध्दव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेत संभाजी ब्रिगेड यांच्याशी युती करत असल्याची घोषणा केली.
यानंतर पुन्हा एकदा मोठी बातमी समोर येत आहे. संभाजी ब्रिगेडची मातृसंस्था असलेल्या मराठा सेवा संघाने देखील शिवसेनेला पाठिंबा जाहीर केला आहे. आगामी निवडणुकीच्या दृष्टीने ही शिवसेनेसाठी फायद्याची ठरणार का याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.
दरम्यान, आज मराठा सेवा संघाचा 32 वा वर्धापन दिन आहे. त्यानिमित्तने मराठा सेवा संघ आपला नवीन चेहरा घेऊन येत असल्याची माहिती मराठा सेवा संघाचे संस्थापक कार्याध्यक्ष अर्जुन तनपुरे यांनी दिली.