मागील काही वर्षांपासून सरकारला चांगली पत्रकारिता करुन जाब विचारणारे काही मोजकीच माध्यमं अस्तित्वात आहेत. यात मराठीत भाषेत काम करणारे तर हातावर मोजण्या एवढेच चॅनेल असतील.
मराठी मेनस्ट्रिम माध्यमांना पर्यायी म्हणून मॅक्स महाराष्ट्रचं नाव आवर्जून घेतलं जातं. मॅक्स महाराष्ट्रने नेहमीच शोषित वंचित समुहांचा आवाज बनून आजपर्यंत काम केलं आहे. मात्र मॅक्स महाराष्ट्रचे युट्युब चॅनेल कम्युनिटी स्ट्राईकच कारण देत बंद करण्यात आले आहे.
संपादक रविंद्र आंबेकर यांनी फेसबूक पोस्ट शेअर करत याबाबत माहिती दिली आहे. २०१८ साली घडलेल्या घटनेचे वार्तांकन मॅक्स महाराष्ट्रने केलं होते. याच एका दलित मुलाची मॉब लिंचिंगद्वारे हत्या केल्याचं वार्तांकन दाखवण्यात आलं होते.
मात्र याबाबत मेनस्ट्रिम माध्यमांनी देखील वार्तांकन केलंलं असताना केवळ मॅक्स महाराष्ट्र चॅनेलवर कारवाई का असा प्रश्न सोशल मीडियावर उपस्थित केला जात आहे. दरम्यान, याआधी देखील मॅक्स महाराष्ट्रचा चॅनेल हॅक करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. त्यावेळी हॅकरने युट्युबवर अश्लील व्हिडीओ पोस्ट केले होते.