पुणे | देशाचे पहिले पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरू यांचा वाढदिवस हा बालदिन म्हणून साजरा केला जातो. यामुळे १४ नोव्हेंबर दिवशी देशभरात लहान मुलांसाठी विविध उपक्रमांचं आयोजन केले जाते.
याच पार्श्वभूमीवर बालदिनाचे औचित्य साधून पुण्यातील उरवडे येथील पुसाळकर स्वरनाद निवासी पुनर्वसन केंद्राच्या वतीने वय ३ ते ६ वर्ष कर्णबधिर वयोगटातील मुलांच्या सहलीचे आयोजन करण्यात आले होते. स्वरनाद कॉक्लिआ या कर्णबधिर सेवाभावी संस्थेने बालदिन विशेष चिमुकल्यासोबत घालवण्यासाठी एका आगळ्यावेगळ्या पध्दतीने साजरी करण्याचा उपक्रम हाती घेतला.
या सहलीत मुलांना पुण्यातील हडशी येथे संत दर्शनला भेट देत महाराष्ट्रची परंपरा, संताविषयीची ओळख करून दिली. तसेच कर्णबधिर मुलांना महाराष्ट्तील ऐतिहासिक अशा संत पंरपरेची अधिक माहिती व्हावी असा हा या उपक्रमाच्या मागील मुख्य उद्देश होता.
या सहलीमध्ये संस्थेच्या संचालिका सौ.रक्षा देशपांडे शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी सहभागी होते. तर संचालक डॉ. अविनाश वाचासुंदर, संस्थेचे आधारस्तंभ यांचे मार्गदर्शन या सहलीला लाभले. या सहलीमध्ये विद्यार्थ्यांना मिळालेल्या माहितीमुळे एक वेगळं विश्व पाहायला मिळालं असल्याचे मुलांनी सांगितले.