फुटबॉल वर्ल्डकप २०२२ सध्या कतारमध्ये सुरु आहे. या वर्ल्डकपसाठी जगभरातील चाहते सध्या कतारमध्ये येत आहेत. २० नोव्हेंबर दिवशी वर्ल्डकपचा भव्यदिव्य असा दिमाखदार स्वागत सोहळा पार पडला. या सोहळ्यासाठी जगभरातील फुटबॉल चाहते उपस्थित होते.
यानंतर वर्ल्डकपचा पहिलाच सामना हा यजमान कतार आणि इक्वेडोर यांच्याच पार पडला. या सामन्यात कतारला पराभव २-० असा पराभव स्विकारावा लागला होता. मात्र या सामन्यावेळी उपस्थित असणाऱ्या काही जपानी प्रेक्षकांनी केलेल्या कृतीमुळे जगभरातील चाहते त्यांचे कौतुक करत आहेत.
नेमकं काय घडलं ?
कतार आणि इक्वेडोर यांच्यातील सामन्यानंतर स्टेडियममध्ये मोठ्या प्रमाणावर कचरा झाला होता. बॉटल्स, कपडे, पोस्टर्स, खाद्यपदार्थ अशा अनेक वस्तू प्रेक्षकांनी बेजबाबदारपणे स्टेडियमवरच टाकलेल्या दिसत होत्या. ही गोष्ट काही जपानी प्रेक्षकांच्या निदर्शनास आल्यावर हातात पिशवी घेऊन त्यांनी हा कचरा गोळा करायला सुरुवात केली. हा व्हिडीओ सध्या जगभरात व्हायरल होत आहे.
شي ما شفتوه من افتتاح كأس العالم! 😩🇯🇵 pic.twitter.com/GqB17hg9EX
— عمر فاروق (@omr94_) November 21, 2022
दरम्यान, बहरीनचा प्रसिध्द कंटेट क्रियेटर उमर फारूक यावेळी स्टेडियमध्ये उपस्थित होता. त्याने या घटनेचा व्हिडीओ काढून सोशल मीडियावर शेअर केला.