सध्या जगभरात कतार फुटबॉल वर्ल्डकपची चर्चा सुरु आहे. यात सौदी अरेबियाने बलाढ्य असणाऱ्या मेस्सीच्या अर्जेंटिनावर मिळवलेल्या विजयाची चर्चा सुरू होती, याच धर्तीवर आणखी धक्कादायक निकाल समोर आला आहे.
काल झालेल्या सामन्यात जागतिक क्रमवारीत २४ व्या क्रमाकांवर असणाऱ्या जपानने बलाढ्य अशा जर्मनीचा पराभव केल्याने सगळ्यांच्याच भूवया उंचावल्या आहेत. या सामन्यात जपानने २-१ असा विजय मिळवत जर्मनीला जबर धक्का दिलाय.
जर्मनीने आजतायगायत तब्बल ४ वेळा फुटबॉल वर्ल्डकपवर आपलं नाव कोरलं आहे, या वर्ल्डकपमध्ये देखील जर्मनीकडे विजेतेपदाचे दावेदार म्हणून पाहिले जात आहे.
दरम्यान, ई गटात जपान आणि जर्मनी सोबत स्पेन आणि क्रोटारिका या देशांचा समावेश आहे, यातील जर्मनी आणि स्पेन हेच देश सुपर १६ मध्ये प्रवेश करतील असा अंदान अनेकांनी वर्तवला होता. मात्र जपानच्या विजयाने सगळेच आश्चर्यचकीत झाले आहेत.