• Home
  • ताज्या बातम्या
  • लेख
  • संपर्क
  • आमच्यासाठी लिहा
  • Advertisement
Friday, February 3, 2023
The Bhongaa
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • खेळ
  • विज्ञान + तंत्रज्ञान
  • रोजगार
  • मनोरंजन
  • लेख
  • The Bhongaa Stories
No Result
View All Result
The Bhongaa
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • खेळ
  • विज्ञान + तंत्रज्ञान
  • रोजगार
  • मनोरंजन
  • लेख
  • The Bhongaa Stories
ADVERTISEMENT
Home ताज्या बातम्या

GYM करणाऱ्यांना पण हर्ट अटॅक का येतोय ? तुम्ही ‘या’ चुका करताय का ? वाचा

by The Bhongaa
November 25, 2022
in ताज्या बातम्या, लेख
Reading Time: 1 min read
A A

जय | व्यायाम करीत असणाऱ्याला कोणताच आजार होणार नाही किंवा त्याला स्ट्रोक अथवा हार्ट अटॅक येणार नाही ह्या भ्रमातून आपण बाहेर यायला हवं. व्यायाम म्हटल्यावर जिम किंवा वजन उचलणे ही मानसिकता आपण बदलायला हवी. चालणे, हातवारे करून वॉर्म अप करणे, स्ट्रेचिंग करणे हा सुद्धा व्यायामच आहे. प्रत्येकाने आपल्या वयानुसार, आपल्या शारिरीक Ability नुसार तसेच आपल्या Goal नुसार व्यायाम करायला हवा, आणि हा व्यायाम करताना त्याला महत्वाची जोड आहे ती योग्य आहाराची.

सप्लिमेंट आणि स्टिरॉइड्स

आपण नेहमी वाचतो किंवा ऐकतो की अमुक एक जण व्यायाम करायचा परंतु त्याला अटॅक आला अथवा स्ट्रोक आला. शरीरयष्टी चांगली होती मग असं का झालं? मी बरेच वर्षे फिटनेस इंडस्ट्रीमध्ये असल्याने अशा केसेस पाहिल्या आहेत त्यामुळे माझ्या अनुभवाने, नॉलेजने काही गोष्टी तुम्हाला सांगाव्याश्या वाटतात. इथं पहिले आणि महत्वाचे कारण म्हणजे कमी वेळात लवकर बॉडी बनविण्याची घाई. त्यामुळे मुले सप्लिमेंट आणि स्टिरॉइड्स कडे वळतात. सप्लिमेंट कंपन्या पावसातील कुत्र्यांच्या छत्री प्रमाणे उगवल्या आहेत. त्यात फेक कंपनीचे प्रमाण जास्त आहे. कारण मागणी तसा पुरवठा हे सूत्र इथे ही लागू आहे. प्रोटीन, क्रियेटीन, BCAA ( अमिनो ऍसिडचा प्रकार) असे नाना प्रकारचे सप्लिमेंटला मार्केटमध्ये उत आलाय.

हर्टवर प्रेशर का येतं ?

बरेच स्टिरॉइड्स टॅब्लेटस, इंजेक्शन यांची जोरदार मागणी आहे, हे मेडिकल मध्ये उपलब्ध नसले तरी याचं ब्लॅक मार्केट प्रचंड मोठा आहे. आपण एखाद्या बॉडी बिल्डरच्या तोंडून “डेक्का” ह्या इंजेक्शनचे नाव ऐकले असेलच. ह्या आणि अशा टेस्टोस्टिरॉन, बोलडीनन, सायपोनेट वगैरे ते GH (growth harmones) IGF ( insuline growth factor) पासून हजारो इंजेक्शन आहेत. बरीच मुलं ह्याचा वापर करतात. काही जिम ट्रेनर सुद्धा सजेस्ट करतात, पण आपलं aim काय आहे? आपल्याला बॉडी बिल्डिंग करायची आहे की फक्त फिट रहायचं आहे? ह्या स्टिरॉइड्सचा आपल्या शरीरावर काय विपरीत परिणाम होणार आहे? PCT म्हणजे काय? क्रियेटिन लेव्हल किती वाढली आहे? ब्लड प्रेशर किती वाढला आहे? ह्याचा विचार ही मंडळी करीत नाहीत आणि मग हार्ट वर प्रेशर आल्याने हार्ट अटॅक येणे साहजिक आहे.

Pre workout साठी बुस्ट

काहीजण म्हणतील की, आमचा अमुक मित्र अथवा नातेवाईक स्टिरॉइड्स घेत नव्हता तरी त्याला अटॅक अथवा स्ट्रोक कसा आला? तर मी माझ्या अनुभवाने सांगतो की, जो स्टिरॉइड्स घेतो तो केव्हाच जगजाहीर सांगत नाही. काही मुलं तर घरी आई-वडिलांना माहीत पडू नये म्हणून मित्रांकडे स्टिरॉइड्स ठेवतात काहीजण जिममध्ये पर्सनल लॉकर घेऊन त्यात ठेवतात. दुसरे असेही आहेत जे स्टिरॉइड्सचा वापर करीत नसतील तरीही त्यांना अटॅक अथवा स्ट्रोक का येतो? हा प्रश्न महत्वाचा आहे. मुळात वजन वाढवताना काय खायला हवं ह्याचे नॉलेज फार कमी जणांना असते, गुड फॅट आणि बॅड फॅट काय आहे हे ह्यांना माहीत नसते. हे कॅलरी डेफिशियंसी मध्ये आहार घेत नाहीत. दुसरं म्हणजे pre- workout सप्लिमेंट. ह्यांना स्वतःला बुस्ट करण्यासाठी, व्यायाम करताना जास्त एनर्जी मिळण्यासाठी ह्याची सवय लागते. काहीजण रेडबुल घेतात तर काहीजण कॉफी तर काहीजण सप्लिमेंट. पण ही pre-workout तुमची झोप मारून टाकते, हे कोणाच्या लक्षात येत नाही.

संबंधितबातम्या

Movie Review: फसलेलं ‘वेड’

जेजुरीत जन्माला आलेला शिवाजीराव गायकवाड कसा झाला सुपरस्टार रजनीकांत?

…म्हणून प्रयत्न करूनही पवारांना राष्ट्रवादी काँग्रेस साठी ‘चरखा’ चिन्ह मिळाले नाही!

“माझं तुझ्यावर प्रेम आहे” शरद पवार काॅलेजमध्ये ‘प्रेमपत्र’ लिहितात तेव्हा! वाचा

Hidden fat

पुरेशी झोप नसल्याने BP वाढणारच. अशातच दररोज pre workout च्या अतिसेवनाने तुमचा bp वाढतच राहतो आणि शेवटी तुम्हाला स्ट्रोक येतो, अर्धांगवायूचा झटका येतो. हार्ट अटॅकचे ही तसेच आहे. “कारडीओ व्हस्क्युलॅरिटी” हा प्रकार आपल्यातील बऱ्याच लोकांना माहीत नाही. चालणे हाच सर्वात उत्तम व्यायाम आहे याकडे बरेचजण दुर्लक्ष करतात. एखादा बारीक शरीरयष्टी असणारा अथवा असणारी असेल तर तू चालू नकोस आणखीन बारीक होशील असा चुकीचा सल्ला दिला जातो.त्यामुळे कधी असेही आपल्याला ऐकायला मिळते की, अरे तो खुप बारीक होता तरीही त्याला अटॅक आला. खरंतर ह्यासाठी “Visceral body fat” म्हणजेच hidden fat (छुपी चरबी” हा काय प्रकार आहे हे नीट समजून घेतले पाहिजे. ही चरबी शरीरात अत्यंत खोलवर साठलेली असते ती आतड्यांभोवती तसेंच यकृत आणि हृदयाभोवती साचलेली असते.ह्याचा धोका सगळ्यात जास्त असतो. ह्याचे शरीरातील प्रमाण 10% पेक्षा जास्त असल्यास धोका संभवतो. ती कमी करण्यासाठी तुम्हाला अगोदर ती आपल्या शरीरात किती प्रमाणात आहे हे कळायला हवं.

लिपिड प्रोफाइल टेस्ट

मुळात आपल्याला बाहेरच्या बऱ्याच गोष्टी ज्ञात असतात. परंतु आपल्या शरीराविषयीच आपल्याला काही ठाऊक नसते. खरतर हा आपला हलगर्जीपणाच म्हणावा लागेल. त्यामुळे आपल्याला आपला BP नियमित तपासायला हवा, मधुमेह तपासायला हवा. तसेच व्यायाम सुरू करण्यापूर्वी एखादी “लिपिड प्रोफाइल टेस्ट” करून घ्यावी, ज्यात तुम्हाला तुमचे कोलेस्ट्रॉल आणि क्रियेटिन लेव्हल कळेल. आपापल्या जिम मध्ये BMI डिटेक्टरची मागणी करायलाच हवी, मुळात जिमने हे ठेवणे बंधनकारकच करायला हवे. त्यात काही महत्वाचे पॅरॅमिटर दर महिन्याला तपासून त्याची नोंद ठेवायला हवी, जसे तुमचे वजन, उंची, तुमची बॉडी मेजरमेन्ट तसेच BMI, BMR, V. fat तसेच BP machine,SPO2 machine. body temperature वगैरे.

तुम्हाला शिकविणारा ट्रेनर हा सर्टीफाईड आहे का? हे तपासून घेणे खूप महत्वाचे आहे. हल्ली यु ट्यूबला व्हिडीओ पाहून बरेच जण फिटनेस इन्स्ट्रक्टर बनतात. You tube वर एखादी सर्जरी पाहून तुम्ही डॉक्टर होऊ शकता का? आणि अशा तथाकथित डॉक्टर कडून तुम्ही तुमच्या शरीराचा इलाज करून घ्याल का? आई-वडिलांनी ही आपल्या मुलांवर लक्ष ठेवायला हवं, मुलांची जिम बॅग चेक करायला हवी, आपला मुलगा काय टॅब्लेटस, सप्लिमेंट घेतो का ह्यावर बारीक नजर ठेवायला हवी, त्यांना शिकविणाऱ्या ट्रेनर्सच्या संपर्कात असायला हवं.

हल्ली धकाधकीच्या जीवनात व्यायाम हा हवाच, त्याला योग्य आहाराची आणि चांगल्या झोपेचीही गरज आहे. आपलं शरीर कसे घडवावे हे आपल्या हातात आहे.

( सदर लेख यापुर्वी जय यांच्या फेसबूक वॉलवर प्रकाशित झाला आहे)

 

ShareTweetSendShare
Previous Post

समीक्षण | पिढीजात : भ्रष्ट प्रशासन आणि राजकारण चव्हाट्यावर आणणारी पिढीजात

Next Post

“महिला कपडे नसल्या तरी चांगल्या दिसतात” रामदेव बाबांचं वादग्रस्त वक्तव्य

Related Posts

Movie Review: फसलेलं ‘वेड’
ताज्या बातम्या

Movie Review: फसलेलं ‘वेड’

January 1, 2023
जेजुरीत जन्माला आलेला शिवाजीराव गायकवाड कसा झाला सुपरस्टार रजनीकांत?
ताज्या बातम्या

जेजुरीत जन्माला आलेला शिवाजीराव गायकवाड कसा झाला सुपरस्टार रजनीकांत?

December 12, 2022
…म्हणून प्रयत्न करूनही पवारांना राष्ट्रवादी काँग्रेस साठी ‘चरखा’ चिन्ह मिळाले नाही!
लेख

…म्हणून प्रयत्न करूनही पवारांना राष्ट्रवादी काँग्रेस साठी ‘चरखा’ चिन्ह मिळाले नाही!

December 12, 2022
“माझं तुझ्यावर प्रेम आहे” शरद पवार काॅलेजमध्ये ‘प्रेमपत्र’ लिहितात तेव्हा! वाचा
लेख

“माझं तुझ्यावर प्रेम आहे” शरद पवार काॅलेजमध्ये ‘प्रेमपत्र’ लिहितात तेव्हा! वाचा

December 12, 2022

महत्वाच्या लिंक्स

  • Home
  • ताज्या बातम्या
  • लेख
  • संपर्क
  • आमच्यासाठी लिहा
  • Advertisement

Category

  • Fact Check
  • आंतरराष्ट्रीय
  • खेळ
  • ताज्या बातम्या
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • रंजक किस्से
  • राजकीय
  • रोजगार
  • लेख
  • विज्ञान + तंत्रज्ञान
  • शिक्षण
  • संपादकीय
  • सामाजिक

आम्हाला फॉलो करा

  • Facebook
  • Instagram
  • Youtube
  • Twitter

© 2021 The Bhongaa - Designed by Bhongaa Media. Hosted on Cloudways.

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • खेळ
  • विज्ञान + तंत्रज्ञान
  • रोजगार
  • मनोरंजन
  • लेख
  • The Bhongaa Stories