पतंजलीचे बाबा रामदेव देशांत कायम काही ना काही कारणाने चर्चेत असतात. याच धर्तीवर त्यांनी पुन्हा एकदा आक्षेपार्य वक्तव्य केल्याने सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी त्यांना धारेवर धरलं आहे. रामदेव बाबा एका कार्यक्रमासाठी ठाण्यात उपस्थित होते. यावेळी त्यांनी महिलांविषयी वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.
काय म्हणाले रामदेव बाबा ?
“महिला साडी नेसल्यावर, सलवार कुर्त्यावरही चांगल्या दिसतात… आणि काही नाही घातल तरी चांगल्या दिसतात.”
दरम्यान, पतंजली योगपीठ आणि मुंबई महिला पतंजली योग समितीच्या वतीने शुक्रवारी योग विज्ञान शिबीर आणि महिला संमेलनाचे आयोजन ठाण्यातील हायलँड भागात करण्यात आले होते. या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस देखील उपस्थित होत्या.