गुरुवार आणि शुक्रवार दिनांक ०१ व ०२ डिसेंबर २०२२ या दोन दिवशी इला फाऊंडेशन पुणे, या संस्थेच्या वतीने “इला हॅबिटॅट”, पिंगोरी,
तालुका पुरंदरयेथे उलूक उत्सव आयोजित करण्यात आला आहे. या उत्सवामध्ये शालेय विद्यार्थी, शिक्षक, पालक, शेतकरी व निसर्ग मित्रांसाठी विविध गोष्टी पाहण्याची व शिकण्याची संधी मिळणार आहे.
इला फाऊंडेशनच्या वतीने २०१८ ला आयोजन केलेल्या पहिल्या उलूक उत्सवाची दखल राष्ट्रीय पातळीवर घेण्यात आली होती. तर २०१९ मधील उलूक उत्सवाची दखल जागतिक पातळीवर घेण्यात आली होती. यासाठी बावीस देशांमधील संशोधक पिंगोरी येथे या उत्सवास भेट द्यायला देण्यासाठी आले होते.
घुबडाबद्दल माहिती
या उलूक उत्सवामध्ये घुबडाबद्दल माहिती दिली जाते. घुबड हा शेतकऱ्याचा मित्र आहे. घुबडांबद्दल समाजात मोठया अंधश्रध्दा व चुकीचे समज आहेत. घुबडांच्या भारतात एकूण ४२ प्रजाती आढळत असून त्याची संपूर्ण माहिती सर्वांना व्हावी या उद्देशानेच उलूक उत्सवाचे आयोजन केले आहे.
०१ व ०२ डिसेंबर ला पिंगोरी येथे होणाऱ्या उलूक उत्सवामध्ये घुबडांची शास्त्रीय माहिती, सांस्कृतिक वारसा व महत्व समजण्यासाठी घुबडांच्या विविध कलाकृती, चित्रे, गायन, वादन, नाटिका, नृत्य, वक्तृत्व, पोवाडा, रांगोळी, मेंदी काम, फेस पेंटिंग व लेख अशा अनेक गोष्टींचा समावेश असणार आहे.
घुबड – नाणी, पोस्टाची तिकिटे, विविध वस्तू, फ्रिजवरील घुबड, घुबडांची छायाचित्रे यांचे प्रदर्शन ,लघुपट व माहितीपट अशा विविध माध्यमातून घुबडांची जीवनप्रणाली स्पष्ट केली जाणार आहे. या उलूक उत्सवासाठी शाळा ,महाविद्यालय आणि विविध निसर्गप्रेमी संस्था, शेतकरी आणि पालक सहभागी होऊ शकतात.
उलूक उत्सवाला भेट देण्यासाठी संपर्क –
| डॉ. सुरुची पांडे – 9881144651 | म.झैद अत्तार – 8793241786 |