महाराष्ट्राच्याच नव्हे तर देशाच्या राजकारणात काही घडामोडी घडल्या तर यामागे Sharad Pawar शरद पवारांचाच हात असू शकतो, अशी वक्तव्य करणारी बरीचशी मंडळी आपण पाहत असतो. म्हणूनच पवार आणि राजकारण हे समीकरण जवळपास गृहीतच धरलं जातं.
आजही पवारांचं नाव विरोधकांकडूनही तितक्याच आदरानं घेतलं जातं. एव्हाना Mahavikas Aghadi महाविकास आघाडी सरकारची स्थापना करून याची चुणूक त्यांनी दाखवून दिलीच आहे. पवारांनी अनेक राजकारणी व्यक्तींचे सिक्रेट किस्से बाहेर काढले आहेत. मात्र पवारांचा असा एखादा विनोदी किस्सा सहसा कुणी सांगताना दिसत नाही.
मात्र दस्तुरखुद्द Sushilkumar Shinde सुशीलकुमार शिंदे यांनीच पवारांच्या काॅलेज आयुष्याला एक किस्सा शेअर केला आहे. शरद पवारांचं शिक्षण पुण्यातील बिएमसीसी महाविद्यालयात पार पडलं . शिंदेही यादरम्यान लाॅ काॅलेजला शिक्षणाला होते. राजकारणातून नव्हे तर या आधीही पवार-शिंदे एकमेकांचे जिगरी मित्र होते.
बिएमसीसी शिक्षण घेत असताना शरद पवार खोडकर होते. एकदा पवारांच्या एका मित्राला काॅलेजमधली मुलगी जाम आवडायची. आपल्या प्रेयसीला हा मित्र बरीच प्रेमपत्र लिहायचा. मात्र प्रेमपत्र द्यायचं धाडसं कधीच झालं नाही. पवारांनी या प्रेमपत्र प्रकरणाची मजा घ्यायची ठरवली.
पवारांनी चक्क प्रेयसीच्या नावानेच मित्राला खोटं प्रेमपत्र लिहिलं. ‘माझ मनापासून तुझ्यावर प्रेम असून मला भेटायला ये. रविवारी 3 वाजता चित्रपट बघायला जाऊ’ असं काहीसं पत्रात लिहून टाकलं. मित्रही रविवारी चित्रपटाला गेला मात्र प्रेयसी काही आलीच नाही. शेवटी कंटाळून मित्र थिएटरमध्ये जाऊन बसला.
अचानक तिथं शेजारच्या खुर्चीवर पवार येऊन बसले. पवारांनी खुनवून प्रेयसी आली का रे? असा सवाल करताच मित्राच्या ध्यानात हा सगळा मामला आला. शिंदेंनी हा किस्सा जेव्हा व्यासपीठावर सांगितलं तेव्हा प्रेक्षकही हसून लोटपोट झाले.