सध्या महाराष्ट्रात रॅपरची संख्या वाढली आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यातून रॅपर आपलं मत रॅपच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवत आहेत. पण त्यात अनेक रॅपर फक्त शिव्यांचा भडीमार करत केवळ आणि केवळ व्ह्यूज मिळवण्यासाठी या कलेचा वापर करत आहेत.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या, फुले, आंबेडकरांच्या भूमीत त्यांच्या विचारांना वेशीवर टांगत आजकाल रॅपर एकमेकांच्या आया बहिणीवर शिव्या देत महाराष्ट्राच्या संस्कृतीचे विकृतीकरण करत आहेत.
पण अश्यातच फक्त प्रसिद्धीच्या आहारी न जाता अस्सल मराठमोळ्या संस्कृतीच दर्शन घडवणार “मराठी साज” हे रॅप साँग “रॅपबॉस” या रॅपरने बनवून मराठी रॅप कसा याचं उत्तम उदाहरण जनतेसमोर सादर केलं आहे.
रॅपबॉस नेहमीच आपल्या गाण्यातून सामाजिक संदेश देत असतो. शिक्षणाचा बाजार, सांगा शेती करू कशी, नारिजात यासारखे अनेक रॅप प्रसिद्ध केले आहेत.
मराठी साज हे “एक होता रॅपर” या अल्बम मधील तिसर गाणं असून हा संपूर्ण अल्बम यूट्यूबवर रॅपबॉस चॅनलवर उपलब्ध आहे. या गाण्याच गीत, संगीत आणि शब्द रॅपबॉसचे असून याच्या व्हिडिओचे दिग्दर्शन आणि संकलन उमाकांत येळे यांनी केले आहे. तसेच या गाण्याला निर्माते म्हणून राहुल शेळके आणि सुबीन डेनियल यांनी सहकार्य केले आहे.