शिवाजी विद्यापीठाच्या डिपार्टमेट ऑफ टेक्नॉलॉजीचा (Department of Technology) Symphony 2023 सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. 13 मे ला आयोजित केलेल्या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेत आपला कला आविष्कार सादर केला.
इंजिनिअर होण्याचं स्वप्न बघत असताना मुलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी दरवर्षी DOT कडून या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येतं. मोठ्या संख्येने विद्यार्थी आपला सहभाग नोंदवत असतात. या वर्षी देखील मोठ्या संख्येने भाग घेत विद्यार्थ्यांनी गायन, नृत्य यासारख्या सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये आपला ठसा उमटवला.