कडक उन्हापासून बचाव करण्यासाठी लोक उन्हाळ्यात काकडी खात असतात. काकडी आपल्याला हायड्रेटेड रहायला आणि वेट लॉसमध्ये मदत करते
काकडी आपल्याला सहज आणि सर्वत्र मिळते. काकडीमध्ये कमी कॅलरीज असतात जे आपल्याला वजन कमी करण्यास मदत करतात
काकडीमध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम, फॉस्फरस, मॅगनीज, लोह, झिंक आणि अँटीऑक्सीडेंट यांसारखे पोषक घटक आहेत.
उन्हाळ्यात काकडी खाण्याचे अनेक फायदे असेल तरीही रात्रीच्या वेळी काकडीचे सेवन आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते
रात्री काकडी खाल्ल्याने पोटात जडपणा येऊ शकतो. काकडी रात्री पचायला जड जाते. त्यामुळे पचनाशी संबंधित समस्या उद्भवू शकतात.
दरम्यान, काकडी नेहमी दुपारच्या सुमारास खावी. दुपारी काकडी खाल्ल्यास शरीरातील इम्युनिटी मजबूत होते. त्यामुळे काकडी नेहमी सकाळी ते दुपारच्या सुमारास खावी.