शरीरात हिमोग्लोबीन वाढवायचं आहे? आहारात ‘या’ गोष्टींचा समावेश करा

शरीरात लोह, फॉलिक ऍसिड आणि ‘व्हिटॅमिन बी’च्या कमतरतेमुळे हिमोग्लोबीन लेवल कमी होते.

रक्तातील हिमोग्लोबीनचं प्रमाण योग्य प्रमाणात असण्यासाठी लोहाची गरज असते.

आवळा – आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी, कॅल्शियम आणि लोह भरपूर प्रमाणात असल्यामुळे शरीरातील हिमोग्लोबीनचे प्रमाण झपाट्याने वाढते.

काळे मनुके: रक्त तयार होण्यासाठी व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्सची कमतरता मनुके भरुन काढण्यास मदत करतात. लोहयुक्त काळे मनुके खाल्ल्याने हिमोग्लोबीन वाढण्यास मदत होते.

गूळ – गुळात लोहाचं प्रमाण भरपूर असतं. लोह वाढण्यासाठी गूळ शेंगदाणे हे एकत्र खाणे फायदेशीर असते.

पालक – पालक हा पोषक तत्वांचा खजिना मानला जातो. आयर्न व्यतिरिक्त पालकमध्ये ए, सी, ई, के आणि बी कॉम्प्लेक्स जीवनसत्त्वे चांगल्या प्रमाणात असतात.